
0
4
0
9
0
3
शब्दशोध
या रे या रे मुलांनो
खेळू शब्दांचा खेळ
वाढेल शब्दसंपत्ती
हर्षामध्ये जाई वेळ
दाखविता मी वस्तू
सांगा तुम्ही तिचे नाव
लिहून दाखवा फळ्यावर
वस्तूचे त्या तुम्ही नाव
गुरूजी दाखवती वस्तू
मुले नाव सांगती भराभर
चुरस वाढली खेळात
लिहून दाखवती फळ्यावर
शब्दशोध घेता घेता
वाढला साठा शब्दांचा
मजेशिर या खेळातून
छंद लागला वाचनाचा
श्रीमती सुलोचना लडवे
जि.अमरावती
======
0
4
0
9
0
3





