0
4
8
2
9
0
नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा
मातेच्या पायाशी अर्पूया भावना,
भक्तीच्या रंगांनी सजवूया जीवनगाथा।
नऊ दिवसांचा हा पवित्र उत्सव,
स्त्रीशक्तीचा गौरव, आदराचा उत्सव॥
आई, बहिणींच्या, लेकीच्या मायेचा गंध,
त्यांच्या त्यागाचा, प्रेमाचा आनंद।
घरात सुखाची फुले फुलोनी राहोत,
त्यांच्या आशीर्वादाने दुःख सारे जावोत॥
कधी दुर्गा, कधी लक्ष्मी, कधी सरस्वती,
प्रत्येक स्त्रीत वसलेली हीच शक्ती।
या नवरात्रीत सर्व माता बहिणींना वंदन,
सुख, शांती, समाधान लाभो हा प्रण॥
सर्व माता बहिणींना नवरात्र
महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
जिल्हा धाराशिव
=======
0
4
8
2
9
0



