काटोलमध्ये दोडकी ग्रामपंचायतीत नमुना आठ अंतर्गत मनमानी आकारणी
ग्रामस्थांची फसवणूक होत असल्याचा आरोप ; अमोल रेवतकर, ग्रामपंचायत सदस्य
काटोलमध्ये दोडकी ग्रामपंचायतीत नमुना आठ अंतर्गत मनमानी आकारणी
ग्रामस्थांची फसवणूक होत असल्याचा आरोप ; अमोल रेवतकर, ग्रामपंचायत सदस्य
दोडकी ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
तीन वर्षात लुटलेला पैसा जनतेला परत करण्याची मागणी
जिल्हा प्रतिनिधी, नागपूर
नागपूर: पंचायत समिती काटोल सर्कलमध्ये येत असलेल्या दोडकी गटग्रामपंचायतमध्ये मागील तीन वर्षापासून होत असलेला अनागोंदी कारभार आता चव्हाट्यावर आला असून, दोडकी ग्रामपंचायतीत जागेच्या नमुना आठ बाबत ग्रामस्थाकडून मागील तीन वर्षात मनमानी आकारणी केल्या असल्याचे अमोल रेवतकर, ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. त्यांनी सि ई ओ यांना (दि. १२ सप्टेंबर) दिलेल्या निवेदनात तीन वर्षात जनतेचा लुटलेला पैसा परत करण्याची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे, येथील गट ग्रामपंचायत दोडकी ग्रामस्थांच्या राहत्या घरांचे व त्यांच्या खाली जागेच्या २०१५-१६ च्या नमुना आठ ची कायदेशीररित्या मोजणी करून ग्रामस्थांकडून त्यांच्या जागेची कर आकारणी ग्रामपंचायतच्या नियमानुसार वसूल केली जात होती. परंतु मागील कर आकरणीच्या /तुलनेमध्ये सन २०२० व २०२१ ची कर आकारणी मागच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात येत होती.
ग्राम पंचायत सदस्य अमोल रेवतकर यांच्या निदर्शनात हे आले तेव्हा अमोल यांनी गट ग्रामपंचायत दोडकी सदस्य असल्याने याची पडताळणी केली तेव्हा ग्रामपंचायत मध्ये असलेल्या रेकॉर्डमध्ये दिसून आले की २०२०-२१ या काळात असलेले तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत मध्ये काम करणारे कर्मचारी व ग्रामसेवक यांनी मिळून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बेकायदेशीर रित्या कोणत्याही वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार न करता नमुना आठ मध्ये ग्रामस्थांची जागा वाढवून मागील तीन वर्षापासून अनाधिकृतपणे कर वसुली करण्यात आलेली आहे. असे निदर्शनात आले. तसेच यातील महत्त्वाची गोष्ट अशी की त्या काळातील सरपंच यांच्या जागेचा २०१५ १६ च्या तुलनेत २०२०- २१ मध्ये मोठ्या प्रमाणात कर कमी झाला आहे त्यांनी २०१५-१६ मधे त्यांचे आर सी सी असलेले घर हे २०२०-२१ मधे दाखवलेच नाही, ही बाब आमच्या निदर्शनात आली.
सरपंच यांच्या तुलनेत सामान्य जनतेची कोणत्या सूत्रानुसार कर आकारणी केली याबद्दल चौकशी करावी या बद्द चे सर्व पुरावे अमोल यांच्या जवळ असून वेळ आल्यावर आम्ही सादर करू. त्याच बरोबर नमुना ८ नुसार घरांची विक्री होत असल्याने विक्री प्रक्रियेत समस्या निर्माण होत आहे तसेच जागेची वाढ झाल्यामुळे जनतेमध्ये वाद विवाद निर्माण होत आहेत असे दुष्परिणाम झाले आहे हा सर्व प्रकार आपण गांभीर्याने घेऊन व या सर्व प्रकरणाची चौकशी करून जनतेचा मागील ३ वर्षात बेकायदेशीर लुटलेला पैसा परत करण्यात यावा व दोषींवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. असे ग्राम पंचायत सदस्य अमोल यांनी सीईओ यांना दिलेल्या पत्रात सांगितले आहे.





