0
4
8
2
9
0
आण्णांची आठवण”
पंचवीस वर्षे झाली तरी, आण्णा
तुमची कमी अजूनही तशीच भासते,
घरातल्या प्रत्येक श्वासात,
तुमच्या पावलांची चाहूल ऐकू येत राहते…
स्वत:साठी कधी काही मागितलं नाही,
चपली घातली नाहीत, कपडे भारी घेतले नाहीत,
पण आम्हा तिघांच्या भविष्यासाठी,
प्राणाचंही ओझं तुम्ही हसत वाहिलं…
भुकेपोटी जगलात, आम्हाला मात्र
कधी उपाशी झोपू दिलं नाही,
तुमच्या हातची कदर तेव्हा कळली,
जेव्हा हातच नाहीसे झाले जीवनातून…
मरणाच्या क्षणीही एकच शब्द—
“मी मेल्यावर तुमचा पगार बघायला मिळतो…”
ही ओळ आजही हृदयाला भोसकते,
जीवनभर आमच्यासाठी झिजलेल्या माणसाची
अंतिम वेदना सांगून जाते…
आण्णा—
तुमची सावली आजही आहे साथ देणारी,
तुमची ऊर्जा आहे शक्ती बनून उभी,
तुमची स्मृती आहे मार्गदर्शक दिवा,
तुम्ही आहात प्रत्येक श्वासात कायमचे जिवंत
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव.
0
4
8
2
9
0



