गणेश भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी मनसे उतरणार रस्त्यावर
महामार्गावर 24 तास रुग्णवाहिका असणार सेवेत
गणेश भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी मनसे उतरणार रस्त्यावर
महामार्गावर 24 तास रुग्णवाहिका असणार सेवेत
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मनसेकडून रुग्णवाहिकेची व्यवस्था
पळस्पे ते माणगाव मनसे सैनिक देणार जागता पहारा
अपघातग्रस्तांना मिळणार तातडीची मदत
कोकणकरांसाठी गणेशोत्सव सणात मनसेचे एक पाऊल पुढे
जिल्हा प्रतिनिधी रायगड
रायगड: कोकणकरांचा महत्वाचा आणि लाडका सण म्हणून गणेशोत्सवाकडे बघितलं जात. हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. अशातच मुंबई गोवा महामार्ग खड्डे मुक्त करण्याचं कामाला वेग येतोय. लाखो गणेश भक्त या महामार्गावरून दरवर्षी गणेशोत्सव सणाला येत जात असतात. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि सुखाचा व्हावा यासाठी मनसेने पुढाकार घेतलाय.
गणेश भक्तांच्या सेवेसाठी पलास्पे ते माणगाव या टप्प्यात ठिकठिकाणी रुग्णवाहिका सज्ज ठेवणार असल्याचा निर्धार मनसेने केलाय. यासोबतच जागोजागी चाकरमाण्यांसाठी अल्पोउपहार, नाश्ता पाणी आणि मेडिसिन इत्यादी गोष्टींची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.