0
4
8
2
9
0
आत्मबंधन
जगावेगळे नाते आपुले
जणू पूर्वजन्मीच आत्मबंधन
युगायुगाच कोरलेलं..
तुझ्या नावाचं काळजावर गोंदण
तुला पाहताच क्षणीचं
डोळे माझे पाणावतात
शब्दावीन तुला सख्या
भाव हृदयाचे माझे कळतात
तुझ्या केवळ आभासाने
मन होतं खूप भावुक
गुपित आपुल्या नात्याचं
तुला आहे का रे ठाऊक?
अंतर्मनी रुजलेलं
अनामिक नातं खोल खोल
दोन मनाला जोडणारी
ही कुठली अदृश्य डोर?
इतका कसा छंद तुझा
हे कोडं मला सुटेना
आत्मबंधन जन्मोजन्मीचे
ही साथ संगत तुटेना
इंदू मुडे, ब्रम्हपुरी.
=========
0
4
8
2
9
0



