Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रसाहित्यगंध

महिला सशक्तीकरण

डॉ. अविनाश प. परांजपे वानाडोंगरी, जि. नागपूर

0 6 6 7 4 7

महिला सशक्तीकरण

आज सकाळीच मी आणि माझी पत्नी नागपूरहून छ. संभाजीनगरला जायला निघालो. मी स्वत: गाडी चालवत होतो. गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलायचे नसते, म्हणून मी माझा मोबाइल माझ्या पत्नीच्या हातात देऊन ठेवत असतो. कारण फोन न उचलणे मेसेज न वाचणे अशाने संबंधित फोन करणार्‍या किंवा मेसेज करणार्‍या व्यक्तींना दुखावल्या सारखे होते, म्हणून!

आम्ही हायवेने शांतपणे आणि योग्य स्पीडने जात होतो. मस्तपणे गप्पा करत, जुनी गाणी ऐकत! तेव्हाड्यात एक मेसेज आला. माझ्या पत्नीने मेसेज वाचला. त्यात लिहिले होते की माझ्या गाडीचे PUC सर्टिफिकेटची मुदत उद्याच संपत आहे. मला लगेच PUC टेस्ट करणे आवश्यक आहे. म्हणून मी ठरविले की रस्त्यातच जर कोठे PUC केंद्र दिसले तर तेथेच आपण टेस्ट करून घेऊ. म्हणून आम्ही वाटेत लागणार्‍या गावे खेड्यांत कोठे PUC केंद्र दिसले तर पाहुयात! म्हणून शोधक नजर ठेऊन गाडी चालवत होतो. असेच आम्ही कित्येक किलोमीटर पुढे जात व गावे ओलांडत पुढे जात राहिलो.

अचानक माझी नजर हायवेच्या लागूनच असलेल्या पेट्रोलपंपावर व त्या शेजारी असलेल्या एका PUC केंद्रावर व लगतच्या चहा वडा भजी विकणार्‍या हातगाडीवर पडली. चला मस्त चहा पिऊन त्यासोबतच PUC टेस्ट दोन्ही करून घेऊयात, म्हणून आम्ही तेथेच गाडी थांबवली. आम्हाला ते PUC केंद्र चालविणारी एक अठरा-वीस वर्षांची मुलगी दिसली. तिने आमच्या गाडीचे पीयूसी टेस्टिंग करून दिले.त्याचे दीडशे रुपये झाले. तिचे नाव सुजाता आहे असे तिने संगितले. मी तिला 200 रुपयाची नोट दिली. शेजारच्याच गाडीवर तिच्याच सारखी एक 20-22 वर्षांची दुसरी मुलगी दिसली. तिला ताई, जरा 50 रुपये दे बरं ! असे म्हणून सुजाताने तिच्याकडून पैसे घेतले. माझ्या पत्नीने विचारताच त्या दोघी बहिणी असल्याचे कळले.

आम्ही म्हटले, पन्नास रुपये नकोत. त्या ऐवजी आम्हाला एकेक चहा व दोन प्लेट बटाटेवडा द्यावा. चहा वडा खाताखाता आम्ही दोघी त्या दोघींचे व हिमतीने हायवेवर ही दोन दुकाने चालवत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यावर त्या दोघी थोडेसे हसून म्हणाल्या की आम्ही दोघीच नाही काकाजी, आमची तीसरी पण बहीण आहे. रस्त्याच्या पलीकडे ती बघा ते पंक्चरचे दुकान तीच चालविते आहे. आमची उत्सुकता आणखी वाढली. त्या दोघींच्या कडून कळले, की आपले शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून व घर खर्च भागविण्यास आणि आपल्या विवाहाचे पैसे जमा करण्यास त्या तिघी ही कामे करतात. त्यांच्याशी बोलतांना समजले की तीन वर्षांच्या पूर्वी त्यांचे वडील लान्स नायक विजय बाराटे हा सीमेवर अतिरेक्यांशी लढतांना हुतात्मा झाले. त्या तिघींची आई, तालुक्याला पोलिस दलात हवालदार आहे. आई वडील दोघेही वर्दीधारी असल्याने त्यांच्या रक्तातच लढाऊ वृत्ती आहे. म्हणूनच त्यांची मोठी बहीण हेमलता ही बी.ए. होऊन गावात रात्रशाळेत शिक्षिकेचे व दिवसा हे चहा वडा विक्रीचे दुकान चालविण्याचे काम करते.

सुजाता बारावी नंतर हे PUC केंद्र चालविणे व रात्री गावातील महिलांचे साडी ब्लाऊज चे फॉल पिको आणि शिवणकाम करते. तिसरी बाबीता ही तालुक्याला आय.टी.आय. मध्ये ऑटोमेक्यानिकचा कोर्स करत आहे. हे सर्व ऐकल्यावर आमचे हृदय अगदी भरून आले. फार फार अभिमान वाटला आम्हाला त्या मुलींचा. आपल्या देशात सशक्त महिलांची परंपरा फार पूर्वीच राजा भरत, ज्याचे नावाने आपल्या देशाचे नाव भारत झाले, त्याची माता शकुंतला हिच्या पासून, गार्गी,मित्रेयी, अश्या मातामहींच्या पासून जिजाऊमासाहेब, राणी दुर्गावती, राणी चेन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी, इंदिराजी गांधी यांच्या सारख्या सशक्त महिलांची परंपरा कायम राखणार्‍या आजच्या या लेकीन्ना मानाचा मुजरा करून आम्ही पुढील प्रवास सुरू केला. जय हिंद!

डॉ. अविनाश प. परांजपे
वानाडोंगरी, जि. नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 6 7 4 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे