एक असाही उपक्रम
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे
एक असाही उपक्रम
आपल्या घरात अनेक देवतांचे फोटो असतात. बऱ्याच घरात देवाज्ञा झालेल्या व्यक्तींचे फोटो लावतात. मग या फोटोवर दररोज हार चढवले जातात. साधातल्या साधा हार घ्यायचा म्हटलं तरीसुद्धा पंचवीस, तीस रुपये हाराची किंमत आहेच. अगदी छोटा हार म्हटलं तर दहा रुपये. जर आपण या हारांची किंमत केली तर अंदाजे आपल्या घरामध्ये दररोज शंभर रुपयांचे हार तरी देवताना जातात. आणि अगदीच नाही म्हटलं तर पन्नास रुपये तर कुठेच गेलेले नाहीत.
आपण एक सामाजिक कार्य म्हणून आपण याच्याकडे पाहूया.
10 ₹ × 30 दिवस= 300₹
300₹ × 12 महिने = 3600₹.
जरी याप्रमाणे आपण गणित केले 25 रुपये दररोजचे बारा महिन्याचे किती? 30 रुपये दररोजचे बारा महिन्याचे किती तर आपल्याला अंदाज येईल की आपण अंदाजे नऊ ते बारा हजार रुपये वर्षाचे खर्च करतो. आपण हार एक दिवस वापरतो दुसऱ्या दिवशी काढतो कारण तो सुकलेला असतो. पुन्हा नवीन हार आपण त्या ठिकाणी घालतो. याच फोटोंना आपण फक्त दररोज स्वच्छ पुसले, गंध वगैरे लावला आणि जर एखादी माळ आपण दुकानातून विकत घेतली आणि ती माळ किंवा तोहार आर्टिफिशियल फुलांचा घातला तर आपले एकदाच पैसे खर्च होतील. दिसायला छान दिसेल. रोज तो हार उतरवायला लागणार नाही.
आपले हे जे साठलेले पैसे आहेत दररोजच्या त्यांची आपण त्यासाठी वेगळी तजवीज करूया. दररोज फुलं,हार घेतो त्याप्रमाणे ते पैसे एका बॉक्समध्ये आपण साठवूया. वर्षा अखेरीला पैसे किती साठले याचा अंदाज घेऊन गरीब मुलांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करूया. अथवा वृद्धाश्रमातील वृद्धांना काही आपल्याकडून देता येईल का याचा विचार करून ऍटलिस्ट आपण एका वेळेचे जेवण सुद्धा यातना देऊ शकतो हा माझा अनुभव आहे. नाही तर त्यांना नॅपकिन, रुमाल, पावडर, तेल, साबण अशा वस्तू सुद्धा आपण पॅकिंग करून देऊ शकतो.
आपण ही गोष्ट स्वीकारली तर समाजकार्य ही होईल आणि आपल्या घरातील देवतांचे फोटो, देवाज्ञा झालेल्या व्यक्तींचे फोटो त्यांच्या वर हारांसाठी खर्च न होता समाजकार्य केल्याचे एक आंतरिक समाधान मिळेल आणि आनंद मिळेल, त्यांचा आशीर्वाद खूप छान असेल. मी अशाही व्यक्ती पहिल्या आहेत की ज्याच्या पतीला देवाज्ञा होऊन त्यांच्या फोटोला हार न घालता त्या रोज 100 रु. रोज बाजूला काढत होत्या. आणि एका कार्यक्रमासाठी त्यांनी 36001 रु. देणगी दिली. समाजात अशाही व्यक्ती आहेत. पटले तर घ्यायचे नाहीतर सोडून द्यायचे.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे
======



