शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक राहुल पाटील

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*☄विषय : झडत्या☄*
*🍂शनिवार : २३/ अॉगस्ट/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*झडत्या*
भिल्ला रे भिल्ला
माझ्या गा संकरा..
सीरावर तुझ्या
चंद्र हासे गोजिरा..
हर बोला../१
वरीले मी तुला…
माज्या जलमाचा जोडा
माझ्या पायामंदी आता
तुझ्या नावाचा रे तोडा..
हर बोला../२
माझ्या जीवाचा तू …
आता झालास गा सखा
तुजसाठीच लेवली मी
माझ्या बोटात गा सिका..
हर बोला../ ३
बांदली रे मी गऱ्यात..
तुझ्या नावाची गरसुली
सांग रे माज्या भिलराजा
करसील ना माझी राखनी..
हर बोला../४
माजी मुसमुसली ज्वानी..
जसी कोऱ्या घडुलीचा पाणी
पर हाये तिच्यावर डोरा
गावच्या पाटलाचा उन्मनी..
हर बोला../५
सरी साकरीले धावजो रे भिल्ला||
करी ही भिल्लीन याचना ||
बोला! एक नमन गवरा.. ||
हर बोला..हर हर महादेव..||
*सौ. तारका रुखमोडे*
*अर्जुनी/मोर.जि.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*झडत्या*
पोळा रे पोळा आला माझ्या बैलांचा पोळा।
झडत्या केले सुरू होऊन गावकरी गोळा।।
बाया रे बाया सार्या झाल्या बहीणी।
माझी बायको सोडून लागल्यारे दावणी।।
पंधराशे रुपये देते बहीणीला महीना।
महागाई वाढवून केली दाजीबाची दैना।।
पाऊस रे पाऊस ,झाला खूप पाऊस।
वाहून गेल घरदार,वावर पर्हाटी ऊस ।।
धीर नको सोडूरे ,आता कंबर तु कस।
हक्कासाठी सरकारच्या उरावर बस।।
भरून भरून किती, किती करु अर्ज।
अजूनकाही सरकार ,देत नाही कर्ज।।
उद्योगपतीला देते लाडानं कोटी कोटी।
शेतकऱ्यांना झिंगा, लाव म्हणे लंगोटी।।
शेतकरी राज्या होय जागृत आता।
फुकटखाऊ नेत्यापुढे ,झुकवू नको माथा।।
तपलं रे तपलं ,उन भाय तपलं।
हमी भावानं नाहीकाही खपलं।।
कर्मचारी नेत्यासाठी ,अच्छेदिन आले।
शेतकरी मात्र संघटणे विना मेले।।
*एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव*
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*झडत्या*
सरकाराच्या दारी
गरीबांची गर्दी
बहिरे झाले राज्यकर्ते
पुढारी बेदर्दी
घरकुल मिळावे म्हणून
सरकार दरबारी हेलपाटे
कास्तकरांच्या हाती
रिकामे धुपाटे
बोला! एक नमन गौरा पार्वती
हर हर बोला हर हर महादेव!!
खासदार आमदारांच्या घरी
गरीबी भिकारी दाटली
पावसाळी अधिवेशनात
त्यांना खैरात वाटली
निवासाची हायफाय
झाली आता सोय
गरीबा हाती छपराची
भाकरीचीही गैरसोय
बोला! एक नमन गौरा पार्वती
हर हर बोला हर हर महादेव !!
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*झडत्या*
काय सांगावी हो,सांगता येईना,
रंक जीवनाची, सरदी गरमी…
बहिरे नि मुके, झाले राज्यकर्ते ,
वळवळते हो,,तया अंगी चर्बी…
घाली हेलपाटा,शासन दरबारी,
घरकुल मिळावे म्हणूनिया…
पोशिंदाच्या हाती न लागे,
कवडीचीही माती खोदूनिया….
बोला! एक नमन गौरा पार्वती
हर हर बोला हर हर महादेव!!
मंत्री संत्री खासदार आमदार,
सर्वात थोर हे,असे हो भिकारी…
सामान्य जनतेच्या अपेक्षेची,
मात्र असते केवळ पाटी कोरी….
पावसाळी असो या हिवाळी,
अधिवेशनात वचने सुमारी…
शब्दांचा फक्त खेळ चालतो,
वाढतात पात्रात पोळी रूमाली…
निवासाला नाही जागा काही,
रस्त्यावर उघडीच झोपडी…
गरीब मरतो जगतो आहेत,
वीना भाकरीविना कोरडी…
बोला! एक नमन गौरा पार्वती
हर हर बोला हर हर महादेव !!
*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*झडत्या*
चक चाळा बैल बहाडा
शेतकरी भोळा सर्जा चा लळा
आला पोळा वाहीनतोळा
कोणाचा गा ..कोणावर डोळा
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव…
गावाच्या आखरावर
अटाशी मटाशी…
नको जाऊ गा.. तिच्या वाट्याशी
वाट्याशी जाऊन पडशील फशी
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव…
आखरावर उभे ढोरकी बल्की
आखर कोणाचा गा..गावच्या धन्याचा ….
गाव कोणाचा ढोरक्या बलक्याचा
ढोरकी बल्की कोण..
बालगोपालांचा सखा कृष्ण..
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव….
देवा शेतकऱ्याला कर सुखी
करू नको कधीही दुःखी
येऊ नको देऊ डोळ्यात पाणी
ठेव तुझ्या.. गा… नावाची बानी
सान थोर मिळूनी करतो विनवणी शंभो शंकरा…
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव…
*सौ सुरेखा कोरे,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️
*झडत्या*
खुल्या माळरानी भरला
बैलांचा सुंदर पोळा
रांगेत बैलजोड्या उभ्या,
करुनी रंगला मेळा.
झडत्या मांडतात वेदना
आजच्या शेतकऱ्याच्या,
सरकार बहिरे झाले,
नाही ऐकणारे त्यांच्या.
झडत्या गातात शंकराचा
जयजयकार भक्तीने,
येते वाजत गाजत गुढी,
भरलेली आशीर्वादाने.
कटाक्ष चालतो झडतीचे
सादरीकरण करताना,
कधी मोडते भाषेची कंबर
सीमा उलंगून जाताना.
झडत्या हा काव्यप्रकार
जनतेस जागृत करणारा,
लोप पावताना दिसतो
कणा भारतीय संस्कृतीचा.
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*झडत्या*
आरवताच कोंबडा
अवघा गाव झाला जागा..
‘आज पोळ्याचा सण’
चला कामाला हो लागा…
सजला मंदिर गावचा,
अगदी नवरदेवावानी…
वाजू लागली पोंग्यावर,
झडत्याची गाव गाणी…
भरला बैलांचा पोळा
सारा गाव झाला गोळा…
चढला झडत्यांवर रंग,
घेत चालू आढावा थोडा..
काढली कुणाची गद्दारी
पकडली कुणाची चोरी…
बाहेर आले झडत्यामधून
देशाचे नितीभ्रष्ट पुढारी….
गावाकडची लोककला ही
लईच आहे बा भारी…
समक्ष वाभाडे काढायची,
ही रीत आहे बा न्यारी….
‘हर हर महादेव ‘गजरात
झाली झडत्यांची सांगता…
फुटला बैलांचा पोळा
आता गाव झाला पांगता…
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*झडत्या*
पोळ्याला देतात झडत्या
बुलंदशी दिली आरोळी
लोकजागृतीची ललकारी
या पर्वी लिहिल्या ओळी..।I
$$ हो.. शिंग फडफडे
शिंगात पडले हो खडे
गडगडे विज आभाळ
पावसाचे अंगणात सडे ..।।
अडत्या रे अडत्या
हवेत मिशा उडत्या
बहाद्दुर डौलत आले
ऐटीने मिसूड तावे तात्या..I|
मेडे काढुन दारावरचे
दुःख घेऊन जा मारबत
झटकुन दैन्य खेद निंदा
गर्जना झडकरी मोसमात..।।
गर्जत गर्जत सांगतो
चढला साजेसा जोश
उत्साह रंग आणले रंगणी
पवन म्हणे होता आवेश..II
*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*झडत्या*
आला गं पोळा आनंदाचा मेळा.
गावभर झाला झडत्यांचा खेळा. !१!
कृषी आनंदावर सरकारचा डोळा
आत्महत्या झाल्यास होती फक्त गोळा
एक नमन गौरा पार्वती ,हर बोला हर हर महादेव !१!
धान्य भरलं कोठारे शेतकरी झाला सुखी.
बैलांच्या कष्टाने घरभर आली रुंजी.
मधल्या मद्ये एजंट भाव पाडून खरीदती.
गरीब शेतकऱ्यांची वाजवतात ते पुंगी.
एक नमन गौरा पार्वती ,हर बोला हर हर महादेव .!२!
ढोल-ताशांचा गजर नाचू गाऊ सारे.
घुंगरांचा नादावर नाचतील बैल खरे.
खोट्या मोठया घोषणांच्या सुरांचे वारे.
गरीब शेतकरी यांना सरकार ना तारे.
एक नमन गौरा पार्वती ,हर बोला हर हर महादेव.!२!
पिकांच्या देवा तुझ ओवाळणी आता
श्रमांची फेड गोड बोजारा आता वाटा.
दुष्काळ पडता प्रत्यक्ष येवूनच भेटा .
समस्या निस्तरा शेतकऱ्यास कर्ज वाटा.
एक नमन गौरा पार्वती ,हर बोला हर हर महादेव.!४!
*प्राजक्ता खांडेकर*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*©सुगत नगर नागपूर*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*झडत्या*
पोळा रे पोळा
यंदाही आला पोळा
दोनचार बैलजोड्या घेऊन
गावकरी झाले गोळा
एक नमन गौरा पार्वती
=बोला हरहर महादेव ॥
बियाण्यांचे भाव गगनाला भिडले
पिवळ्या सोन्याचे दरही कडाडले
कर्जाने शेतकऱ्याचे कातडे काढले
कास्तकाराच्या मालाचे भाव नाही वाढले
एक नमन गौरा पार्वती
बोला हरहर महादेव ॥
काढा रे काढा
लबाडांची धिंड काढा
निवडून दिले तरी
सातबारा नाही केला कोरा
एक नमनगौरा पार्वती
बोला हरहर महादेव ॥
पोळ्याला गावाकडे’ जायची मोठी खुशी
रस्त्याची दैना जशीच्या तशी
चिखलात पाय गुडघाभर फसे
कमालच लोकांची राहतात कसे
एक नमन गौरा पार्वती
बोला हरहर महादेव ॥
जंगल तोडून उभारे कारखाने किती
प्रदुषणाची मनात बाळगा थोडी भिती
मायच्या नावानं झाडे लावण्याची निती
खुर्चीतले कावळे टाकूवरलं लोणी खाती
एक नमन गौरा पार्वती
बोला हरहर महादेव ॥
शेतकरी राजा जागा हो एकदा
सेंद्रीय शेतीच्या पुन्हा दे झडत्या
खत , बी-बियाणे स्वतःचेच वापर
मालाचे भाव तूच पक्के कर
एक नमन गौरा पार्वती
बोला हरहर महादेव ॥
*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





