0
4
8
2
9
7
माझ्या फुला
पारखून घेतले मी तुला
निरखून घेतले तू मला
तुझ्या मधाळ स्पर्शाने
जनू स्वर्ग मिळाला मला
पाहताच क्षणी तुला
तुझे रूप भावले मला
तुझ्या सुब्द सुगंधाने
बघ मोहित केले मला
तू साज शृंगार केला
आन मिठीतघेतले मला
तव हळूवार स्पर्शाने
सुखाचा स्वर्ग मला दिला
असेच फुलत राहा तू
माझ्या प्रीतीच्या फुला
तुझ्या प्रीत फुलाचा मकरंद
होऊन भ्रमर चाखू दे मला
दूर नको जाऊ अशी
मी काळजात ठेवीन तुला
आयुष्यभर श्वासापरि
मी जपत राहील तुला
प्रकाश पुंडलिक गोधने
ता.कंधार जि.नांदेड
0
4
8
2
9
7



