0
4
8
2
9
7
देवा दिली मला लेक
तिला सुखात ठेवं ..,!
पार पाडलं कर्तव्य
नाही कधी रडू दिलं ..,
लेक म्हणे बाबा किती
खस्ता खाता माझ्यासाठी ..,!
नका झुरू माझ्यासाठी
बाबा ! जगा स्वतःसाठी ..,!!
कष्ट करुन बाबांच्या
नाही कापड अंगाला ..,!
लेक म्हणे तुम्हासाठी
काय करू सांगा मला ..,!!
आयुष्यात कधीच खचायचं नाही.
फक्त संयम ठेवायचा
कारण दिवस, काळ, वेळ हे नक्कीच बदलत असते…
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
0
4
8
2
9
7



