बालरंजन केंद्राच्या वतीने मुलांसाठी नाट्यवर्ग
अमृता खाकुर्डीकर, पुणे
बालरंजन केंद्राच्या वतीने मुलांसाठी नाट्यवर्ग
शनिवार, ५ जुलै पासून सुरुवात
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे-दि.25(प्रतिनिधी) नाट्यकला वर्गातून अभिनय शिकता शिकता आत्मविश्वास, सभाधीटपणा आणि सृजनशीलतेशी होणारी ओळख ही शाळेतील अभ्यास, वक्तृत्वं, खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमात सहभागी होण्यासाठीही उपयुक्त ठरते, एकूणच मुलांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वं विकासात नाट्यकलेचा खूपच उपयोग होत असल्याने “बालरंजन” या नामवंत केंद्राच्या वतीने गेली अनेक वर्ष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सहा माहिन्यांच्या कालावधीत साप्ताहिक नाट्यवर्गाचे आयोजन करण्यात येते.
भारती निवास हॉल, प्रभात रोड येथे होणा-या यंदाच्या नाट्यवर्गात “स्वतंत्र थिएटर्स” या प्रयोगशील नाट्यसंस्थेच्या सहकार्याने जुलै ते डिसेंबर २०२५ या सहामाहिन्याच्या कालावधीत दर शनिवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळात वय ७ ते १२ वर्ष या वयोगटासाठी नाट्यवर्गाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दि. ५ जुलै पासून या उपक्रमाची सुरवात होणार आहे. तरी इच्छुक पालकांनी “बालरंजन केंद्रा”शी संपर्क करावा, असे आवाहन केंद्रप्रमुख माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी केले आहे.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क –
प्रज्ञा ताई – मो.नं.8007116240,
दीप्ती ताई -मो.नं. 9657061615
नाट्य प्रशिक्षण स्थळ- भारती निवास हॉल,
प्रभात रोड, १४ वी गल्ली,
इन्कमटॅक्स लेन, एरंडवणा, पुणे ४





