
0
4
8
2
9
0
भावनाशून्य
डोळ्यात तिच्या सोहळे होते
गाली गुलाब फुललेला असायचा…
लांबसडक काळ्याभोर केसांमध्ये
गजरा भाव खाऊन जायचा…
छुम छुम पैंजण किन किन बांगड्या
हृदयाच्या तारा छेडून जायच्या…
अदबिनं सांभाळायची ती डोईचा पदर
खट्याळ तो अलगद बाजूस सरायचा…
अकस्मिक हरले ओठावरचे स्मित
सांजचा दिवा आठवांचे मोहोळ उठवायचा…
कधीच सांगावा यायचा नाही
स्थिरावलेल्या भावनाशून्य नजरेचा…
आशा कोवे-गेडाम
वणी जि.यवतमाळ
0
4
8
2
9
0



