कात्रजच्या अश्विनी फूटपाथ रात्रशाळेत अनोखी दिवाळी साजरी
वसुधा वैभव नाईक,पुणे प्रतिनिधी
कात्रजच्या अश्विनी फूटपाथ रात्रशाळेत अनोखी दिवाळी साजरी
वसुधा वैभव नाईक,पुणे प्रतिनिधी
पुणे: (दि २०) अश्विनी फूटपाथ रात्रशाळा ही योगेश हरणे तसेच अनिल दरेकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली. ही शाळा दोन ठिकाणी चालवली जाते. पुणे स्टेशन, तसेच कात्रज तलाव येथे भरवली जाते. ही शाळा रोज रात्री ७ ते ९ पर्यंत असते.तसेच सोमवार ते शनिवार पर्यंत चालवली जाते. तसेच रविवारी विविध उपक्रम दिवसा घेतले जाते.
अश्विनी फूटपाथ रात्रशाळेला आता पाच वर्ष पूर्ण होतील. अधिकारी, लहान मुले, अबालवृद्ध यांचे वाढ दिवस इथे साजरे केले जातात. वर्ष श्राद्ध निमित्त देखील मुलांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात. तसेच इतर विविध उपक्रम घेतले जातात. कात्रजच्या रात्र शाळेत आज ५० विद्यार्थी आहेत.मागच्या दोन वर्षात आम्ही २५ विद्यार्थ्यांना पुणे महानगर पालिका मध्ये ऍडमिशन करून दिले आहे .
या संस्थेचा उद्देश असा आहे की जी मुलं, मुली सिग्नलवर फुले ,पेन, पुस्तके इतर अनेक वस्तूंची विक्री करत असतात.पण या लहान वयात मुलांना शिक्षणाची खरी गरज आहे, या हेतूने या रात्री शाळा घेण्याची संकल्पना मनात आली आणि आज दोन ठिकाणी शाळा भरते.ह्याचा उद्देश हळू हळू सफल होताना दिसत आहे.
तसेच इथे बऱ्याच शाळेतील शिक्षक , शिक्षिका येऊन वेग वेगळे उपक्रम घेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आज या मुलांसाठी आम्ही एक उपक्रम घेतला. मुलांकडून गाणी म्हणून घेतली. मुलांना खाऊ दिला. पाणी बॉटल्स दिल्या.. मुले खूप आनंदी होती. आणि आम्ही पण खूप आनंदी, समाधानी. आजच्या या उपक्रमात योगेश हरणे, शीतल शर्मा, पुणे, वसुधा नाईक, पुणे हे सर्व सहभागी होते.



