जे. एस. एम. महाविद्यालयात एन. एस. एस. वर्धापन दिन उत्साहात संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
जे. एस. एम. महाविद्यालयात एन. एस. एस. वर्धापन दिन उत्साहात संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलीबाग/ रायगड: (जि.प्र.)जे. एस. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन (दि २४)उत्साहात साजरा कारण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत तसेच प्रा. सचिन भोस्तेकर, प्रा. श्वेता मोकल, प्रा. अदिती दामले व एन. एस. एस. स्वयंसेवक उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना एन. एस. एस. वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरवात एन. एस. एस. ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. अद्वैत घाटपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्यख्यानात सांगितले कि, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वच्छता अभियानात महत्वपूर्ण योगदान आहे. तसेंच एन. एस. एस. हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे उत्कृष्ट माध्यम आहे. विद्यार्थी हा नियमित उपक्रम व विविध शिबिरातून घडत असतो असे प्रा. घटपांडे म्हणाले. त्यांनी पुढे एन. एस. एस. चे उद्धीष्ट, लोगो, व उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली.
प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, विदयार्थ्यांनी विविध उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व आपला सर्वांगीण विकास साधावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले



