0
4
8
2
9
4
ढगा रे ढगा
ढगा रे ढगा बोल माझ्याशी
मी लहान बालक बोलतो
पाठव लवकर पावसाला
नाहीतर तुझी पोल खोलतो
तू आहेस आडदंडीवाला
इकडून तिकडे मारतोस फेरा
पण माझे तू ऐकत नाही
सुकून गेला शेत सारा
ढगा रे ढगा जरा ऐक ना
धरणीला थोडा पाणी दे ना
काळे पांढरे रूप तुझे
आवडतो मात्र सर्वांना
इकडे जातोस तिकडे जातोस
हे तुझे बरे आहे का,,,?
धरती मातेचे काय चालले
हे तू मात्र पाहतोस का
ढगा रे ढगा येणारे बाबा
शांत कर धरणी मातेला
शेत पिकेल तर खाऊन
नाही तर जवळ करू मरणाला
केवलचंद शहारे
सौंदड जि.गोंदिया
=======
0
4
8
2
9
4



