Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरविदर्भ

ज्ञान भक्ती वैराग्याचा संगम म्हणजे पू.आबादादा कपाटेः पू.श्रीसुरेशदादा राहेरकर

रजत डेकाटे -प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

ज्ञान भक्ती वैराग्याचा संगम म्हणजे पू.आबादादा कपाटेः पू.श्रीसुरेशदादा राहेरकर

रजत डेकाटे -प्रतिनिधी

नागपूर: (दि १२): नुकताच महानुभाव सेवा संघ नागपूर अंतर्गत समितीद्वारा पू.श्रीआबादादा कपाटे उर्फ अनिरुद्धजी भावे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आदरणीय महंत श्री न्यायंबासबाबा मकरधोकडा मुख्य अतिथी आदरणीय श्रद्धेय महंत श्री माहूरपिठाधीश मोहूरकरबाबाजी आदरणीय श्रद्धेय श्री अष्टूरकरबाबाजी आदरणीय श्रद्धेय महंत श्रीविश्वनाथ बाबाजी कपाटे,मनसर प्रमुख वक्ते आदरणीय श्रद्धेय श्री सुरेशराजदादाजी राहेरकर तरडगाव, श्री अरण्यग्रामकरबाबा अष्टूरकर, नागपूर,पूजनीय श्री नितीनराज दादाजी बांधकर नागपूर, महंत श्री. क्रिष्णराजबाबा कपाटे, पारशिवणी हे होते.या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अत्यंत सुंदर असा सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला उपस्थित प्रमुख मार्गदर्शक पू श्री सुरेशराजदादाजी राहेरकर यांनी पू. श्री आबादादाजी कपाटे उर्फ अनिरुद्ध भावे म्हणजे ज्ञान,भक्ती आणि वैराग्य याचा त्रिवेणी संगम आहे अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले आणि आबादादांना त्यांनी अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महंत श्री न्यायंबासबाबा मकरधोकडा यांनी पु. श्री आबादादा कपाटे यांना झाकलेले माणिक अशा पद्धतीचा त्यांचा गुणगौरव केला खऱ्या अर्थानं महानुभाव पंथातील माणिक आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजनीय महंत श्री विश्वनाथबाबाजी कपाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महंत श्री गुरुवर्य खंदारकर बाबाजी मनसर आणि आभार राजकुमार शेंडे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजनीय श्री प्रणवदादाजी खंदारकर पू.श्री चक्रपाणीदादाजी कविश्वर श्री तृषालजी रामटेके श्री प्रज्वल खोब्रागडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे