
0
6
1
3
7
7
सारवासारव
प्रथम चूक करायची
नंतर ती निस्तरायची
चूकून झाले म्हणत
सारवासारव करायची ॥१॥
मन दुखावून झाल्यावर
माफी व्यक्त करायची
सारवासारव करून
दिलगिरी दाखवायची ॥२॥
नाजूक तुटलेलं नातं
जुळवाजुळव करायची
तडे गेलेल्या तुकड्यावर
सारवासारव करायची ॥३॥
चूक मान्य करून
पळवाट शोधायची
मन मोठं दाखवून
सारवासारव करायची ॥४॥
स्वतः जीवनात नियमांची
अदलाबदल करायची
डाव हरू लागता
फक्त सारवासारव करायची ॥५॥
श्रीमती नीला पाटणकर
शिकागो
========
0
6
1
3
7
7



