आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला करडईच्या पानांची सुकी भाजी
मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
8
4
माझी पाककला
करडईच्या पानांची सुकी भाजी
साहित्य: दोन मोठ्या वाट्या चिरलेली करडईची पाने,एक मोठा चिरलेला कांदा, पाच ते सहा चिरलेल्या लसूण पाकळ्या, लाल मिरचीचे तिखट एक चमचा, दोन लाल मिरचीचे तुकडे, धने जिरेपूड एक चमचा, हळद, मीठ,एक मोठा चमचा तेल, मोहरी, जिरे, शेंगदाण्याचे जाडसर कूट दोन चमचे, चिरलेली कोथिंबीर १वाटी इत्यादी.
कृती: पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.कढईत तेल घालून लसूण, जिरे, मोहरी, कांदा मिरचीचे तुकडे घालून परतून घ्या, नंतर त्यात तिखट, हळद, मीठ व चिरलेली पाने घालून परतून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. शेंगदाण्याचे कूट,कोथिंबीर पेरून भाकरीसोबत खायला द्या.
वाढप:-ही भाजी दोन जणांना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
=========
0
4
8
2
8
4



