बँक ऑफ बडोदा अलिबाग शाखेचे स्थलांतर
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बँक ऑफ बडोदा अलिबाग शाखेचे स्थलांतर
सुख सागर भवन येथे नवीन परिसरात शाखा
रायगड जिल्हाधिकार्यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग (दि 17 नोव्हेंबर) : भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या अलिबाग शाखेचे नवीन, अत्याधुनिक आणि ग्राहकस्नेही अशा सुख सागर भवन येथे स्थलांतर करण्यात आले असून आज या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन रायगड जिल्हाधिकारी माननीय श्री किशन नारायणराव जावळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्यास बँक ऑफ बडोदा मुंबई झोनचे प्रमुख श्री. सुनील कुमार शर्मा, तसेच नवी मुंबई विभागाचे प्रादेशिक प्रमुख श्री. मनिष कुमार सिन्हा, बँकेचे अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, ग्राहक आणि अलिबाग परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
नवीन शाखा परिसर अधिक प्रशस्त, सुव्यवस्थित आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. ग्राहकांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बँकिंग सेवा देण्याच्या हेतूने हे स्थानांतर करण्यात आले असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रादेशिक प्रमुख श्री. मनिष कुमार सिन्हा म्हणाले, “अलिबागमध्ये बँक ऑफ बडोदा नेहमीच उत्कृष्ट व विश्वासार्ह सेवा देत आली आहे. नवीन ठिकाणी स्थलांतरामुळे आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा, अधिक सोयीस्कर वातावरण आणि उत्तम सेवा अनुभवायला मिळेल. ग्राहकसेवा उंचावण्याच्या आमच्या प्रयत्नांना या नव्या परिसरामुळे अधिक बळ मिळेल.”
मुंबई झोन प्रमुख श्री. सुनील कुमार शर्मा यांनीही सांगितले की, बँक ऑफ बडोदाच्या देशभरातील आधुनिक आणि ग्राहककेंद्री सेवा विस्ताराच्या ध्येयधोरणानुसार अलिबाग शाखेचे हे अपग्रेडेशन महत्वाचे पाऊल आहे. अलिबाग आणि परिसरातील नागरिकांना बँक ऑफ बडोदाच्या विविध सेवा, डिजिटल बँकिंग सुविधा आणि ग्राहकाभिमुख उपक्रमांचा अधिक लाभ मिळावा यासाठी हे स्थलांतर एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.





