नवनिर्वाचित नगरसेवक डाॕ. प्रशांत नाईक यांचे अभिनंदन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

नवनिर्वाचित नगरसेवक डाॕ. प्रशांत नाईक यांचे अभिनंदन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
सुप्रसिद्ध नाईक घराणे व अलिबाग शहर यांचे अतूट नाते आहे. त्याला क्रुतज्ञतेची झालर आहे. या अलिबाग शहराने नाईक कुटुंबियांवर भरभरून प्रेम केले आहे. वेळोवेळी भरभरून मतदान करुन त्यांना शहराचे प्रथम नागरिक (नगराध्यक्ष) बनविले आहे. या घराण्यातील सहा सदस्यांना हे सन्माननीय पद बहाल केले आहे . त्यात रावसाहेब रामराव नथोबा नाईक,अनंतराव नथोबा नाईक श्रीमती सुनिता मधुसूदन नाईक , प्रशांत मधुसूदन नाईक,(तीन वेळा
आणि नमिता प्रशांत नाईक (२ वेळा) या भाग्यवंतांचा समावेश आहे . उद्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत या घराण्याचा आणखी एक सदस्य भूषविण्याची शक्यता नाकारता येत नाही . एवढे भाग्यवान घराणे रायगड जिल्ह्यातच काय पण कोकणातही नाही .कदाचित महाराष्ट्रातही नसावे .
आज जीवघेणी स्पर्धा सर्व क्षेत्रात आहे . राजकारणात तर ही जीवघेणी स्पर्धा टोकाची आहे. पण अलिबाग येथे बिनविरोध नगरसेवकपद मिळविण्याचा बहुमान प्रशांत नाईक यांनी मिळविला आहे . व हा बहुमान अलिबागच्या मतदारांनी उदारहस्ते दिला आहे. म्हणून प्रशांत नाईक यांचे अभिनंदन आणि अलिबागच्या मतदात्यांचेही.





