उत्तर महाराष्ट्रात सप्तश्रृंगी गडावर युवा क्रांतीचा राज्यस्तरीय भव्य दिव्य मेळावा संपन्न
वसुधा वैभव नाईक, पुणे प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्रात सप्तश्रुंगी गडावर युवा क्रांतीचा राज्यस्तरीय भव्य दिव्य मेळावा संपन्न
वसुधा वैभव नाईक, पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नाशिक: दि. 16/11/2025 रोजी सकाळी 09:00 वाजता श्री क्षेत्र सप्तशृंगी देवीगडावर,वणीची देवी येथे युवा क्रांती संघटनेचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
हा मेळावा मा.रवींद्र सूर्यवंशी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष – पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडला. या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तालुके व गावांमधून पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. नाना महाराज कापडणीस राष्ट्रीय उपाध्यक्ष, ह. भ. प. अवचित आनंद मधुकर अहिरे म. रा. प्रदेशाध्यक्ष, मा. राजेश्वर हेंद्रे- राष्ट्रीय संघटक,मा. जयश्रीताई आहिरे -राष्ट्रीय युवती अध्यक्ष, मा. शिवाजी शेलार- महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष, मा. नानासाहेब बढे – संचालक तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मा. राकेश वाघ- महाराष्ट्र प्रदेश सचिव ,मा. आनंद पगार, मा. नितीन कुंदे, मा. गिरीश मोरे, मा. काशिनाथ कोळी मा. भालचंद्र चित्ते, मा. बाबुराव वाढवणे, मा. रूपालीताई सूर्यवंशी, मा. शोभा पाटील, मा शबाना शेख, मा. वैशाली बांगर, मा. वसुधा नाईक,इत्यादी सर्व राष्ट्रीय पदावरील कार्यरत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, उत्साहात हा मेळावा उत्तमरीत्या पार पडला.
काही मान्यवरांची तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. संस्थापकांचे मार्गदर्शन पण भाषण झाले.हा मेळावा यशस्वी केल्याबद्दल आणि सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. सूत्र संचालकांचेही मनःपूर्वक अभिनंदन. याच कार्यक्रमात खास मुंबईवरून आलेले पदाधिकारी – श्री.राकेश सा.वाघ (महाराष्ट्र राज्य सचिव)
श्री.धनेश रामलखानी,श्री.सोहराब मुजावर,श्री.कुणाल शहा,श्री.जितेन देसाई,सौ.सुप्रिया पवार इत्यादी मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी खास भेट दिली.
भेटीचे स्वरूप खालील प्रमाणे होते. सन्माननीय रविंद्र सुर्यवंशी सर (संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष) यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची तसबीर,श्री. शिवाजी शेलार (महाराष्ट्र युवा अध्यक्ष) यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची (प्रतिमा) मुर्ती भेट म्हणून देण्यात आली व मुंबई संघटनेतर्फे राष्ट्रीय व राज्य प्रमुख पदाधिकारी यांना संघटनेचे बॅच( बिल्ले) देण्यात आले. या कार्यक्रमात – “सर्वसामान्यांसाठी कायद्याची ओळख ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अशा उत्साही वातावरणात उत्तर महाराष्ट्राचा युवा क्रांतीचा राज्यस्तरीय सोहळा अधिक बहारदार रित्या संपन्न झाला. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत शिस्तीत व यशस्वीपणे पार पडला.





