सोयाबीन खरेदीसाठी आता हैक्टरी ७:५० क्विंटल प्रमाणे नोंदणी सुरू
रजत डेकाटे प्रतिनिधी भिवापूर

सोयाबीन खरेदीसाठी आता हैक्टरी ७:५० क्विंटल प्रमाणे नोंदणी सुरू
हेक्टरी १५ क्विंटल घेण्याची मागणी प्रलंबित : शेतकरी नाफेडकडे वळले
रजत डेकाटे प्रतिनिधी भिवापूर
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
भिवापूर/ नांद : तालुक्यात सोयाबीनची मळणी अंतीम टप्प्यात असून, खाजगी व्यापा-यांनी हमीभावाच्या आत खरेदी सुरू केली आहे.२० नोव्हेंबर पासून भिवापूर तालुक्यातील नांद येथे सोयाबीन नोंदणी सुरू झाली आहे.यंदा मागील वर्षी पेक्षा हेक्टरी सोयाबीन खरेदिचे निकष बदलून किमान पंधरा क्विंटल घेणार,अशी चर्चा शेतक-यांनमध्ये होती.परंतु शासनाने मागील वर्षीप्रमाणे यंदाही हेक्टरी ७:५० क्विंटल खरेदी करणार असल्याने जाहीर केल्याने शेतक-यांत एक नाराजी निर्माण झाली आहे.
तालुक्यात २० नोव्हेंबर पासून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे.शासनाने मागील वर्षी प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ या भावाने खरेदी केला. त्यात यंदा हमीभावात ४३६ रूपयांनी वाढ करून ५ हजार ३२८ रूपये हमीभाव जाहीर केला आहे. हमीभावात जशी शासनाने वाढ केली, त्याचप्रमाणे हेक्टरी साडेसात क्विंटलची मर्यादा वाढवून पंधरा क्विंटल करण्याची शेतक-यांना आशा होती, ती आशा पूर्ण करत हेक्टरी ७:३० खरेदी करण्याचे आदेश NCCF कडून मिळाले असल्याने सध्या तरी शेतकरी NCCF खरेदीकडे वळला आहे.
- भिवापूर तालुक्यातील नांद येथे खरेदी
राई कॄषी विकास फार्मर प्रोडुसर कंपनी नांद येथे यावर्षी १०५ शेतक-यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली.त्यात नांद,सायगाव, पांजरेपार, धामणगाव,वणी,आलेसूर, बेसूर, चिखलापार, महालगाव या गावातील शेतक-यांचा समावेश आहे.यासाढी याच महिन्यात ५ हजार ३२८ या हमीभावाने सोयाबीन खरेदी होचार आहे
शासनाने सोयाबीन उत्पादकता लक्षात घेऊन किमान हेक्टरी पंधरा क्विंटल खरेदी करावी.अशी मागणी होती ती आता पूर्ण झाली त्यामुळे नाफेड कडेच आम्ही सोयाबीन विकणार असलो तरी हैक्टरी विस क्विंटल होणे गरजेचे आहे.
दिपक तानबा वाढई (शेतकरी नांद)
बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी होणार..
चालू वर्षांचे सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरी ७:५० खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांचे आदेश आहे दरम्यान नोंदणी करताना शेतकरी स्वत: हजर पाहिजे त्यात बायोमेट्रिक पद्धतीने अंगठा घेऊन नोंदणीकृत मोबाईल वर ओ.टी.पी येईल तरच सातबारा नोंदणी होईल सध्या नोंदणी साठी संचालक केंद्रावर शेतक-यांची मोठी गर्दी झाली आहे.चालू वर्षात ५०० शेतकरी नोंदणीकृत होईल असे दिसत आहे.नोंदणी करण्यासाठी मोबाईल क्रमांक ९८२३३३ ६८३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे केंद्र संचालक यांनी सांगितले.
डिमेश पांडुरंग तिमांडे
स़ंचालक – राई कृषी विकास फार्मर प्रोडुसर कंपनी नांद.





