
0
5
5
8
5
8
भांडवलदारांचा महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र
संत शूरवीर देशभक्तांचा
राष्ट्रपुरुष महापुरुष युगपुरुषांचा
जिजाऊ सावित्री रमाई भिमाईचा
सुज्ञ विचारांनी नटलेला
नदीनाल्यांच्या सुरांनी गुंजलेला
वृक्षांच्या हिरवळीने शृंगारलेला
पर्यावरणपूरक सृष्टीने सजलेला
माणसातलं माणूसपण टिकलेला
घराला घरपण असलेला
पासष्ठी पार करून शंभरीकडे झुकलाय
सुज्ञ विचारांचा झराच आटलाय
प्रदूषण व्यसन स्वार्थ राजकारणाने
त्याचा मेंदूच गंजलाय
तो दुष्काळाच्या छायेत पिळवटलाय
कामगार आणि मध्यवर्गीयांना कंटाळलाय
खाजगीकरण उदारीकरण
जागतिकीकरण राबवत
भांडवलदारांच्या ताटाखाली गेलाय
माझा महाराष्ट्र
विलास सूर्यवंशी
नवी मुंबई
=========
0
5
5
8
5
8



