
0
5
1
8
0
2
अहो दाजिबा
आलेत पाहुणे
कुठल्या गावाचे
कुजबुज गावात
कंच्या नावाचे
पंसत पडले
हुंड्यावर अडले
तायडीच्या रूपावर
चक्क भाळले
लगीनघाई झाली
सुपारी फुटली
पंचपक्वान्नाची
पंगत उठली
चारच दिवसात
पाठवणीची वेळ
साधेनासा झाला
मुहूर्ताचा मेळ
अहो दाजिबा
उठा आतातरी
वरात थांबली
जायचं ना घरी
सविता धमगाये
ता. जि.नागपूर
0
5
1
8
0
2



