
0
4
8
2
9
3
लिहिते होऊ या
गर्व आम्हा मराठीचा
थोरवी मराठीची गाऊ या
श्रीमंती वाढविण्या भाषेची
चला सारे लिहिते होऊ या
शब्दांना साज चढवून
लेखणीशी नातं जुळवू या
शिलेदार समूहात आपण
फुलबाग शब्दांची फुलवू या
कथा, कविता, लेख, गोष्ट
आत्मविश्वासाने लिहू या
विचार भावभावना मांडून
जास्तीत जास्त शब्द पेरू या
शिलेदार व्यासपीठावर रोज
मिळे नवनवीन शब्द खजिना
लिहिते होऊ या ज्ञान वाढवू या
चला संधीचं सोन करू या ना
प्रतिमा नंदेश्वर,चंद्रपूर
0
4
8
2
9
3



