Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरवर्धाविदर्भ

कास्ट्राईबच्या वर्धा तालुका अध्यक्षपदी विशाल गावंडे, तर सरचिटणीसपदी नंदन भगत

वर्धा शहर प्रतिनिधी

0 6 4 1 3 0

कास्ट्राईबच्या वर्धा तालुका अध्यक्षपदी विशाल गावंडे, तर सरचिटणीसपदी नंदन भगत

वर्धा शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

वर्धा, (दि १० नोव्हें) : कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संघटनात्मक विस्ताराच्या अनुषंगाने वर्धा तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली असून, तालुका अध्यक्षपदी विशाल गावंडे यांची, तर तालुका सरचिटणीसपदी नंदन भगत यांची निवड करण्यात आली आहे.

विशाल गावंडे यांना विविध सामाजिक चळवळींची असलेली आवड, संघटनात्मक कार्याचा अनुभव, अभ्यासू नेतृत्व आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची भूमिका लक्षात घेता ते मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास नागपूर विभागीय अध्यक्ष प्रमोद मुरार, जिल्हाध्यक्ष आकाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय जुनघरे, जिल्हा अतिरिक्त सरचिटणीस प्रवीण लोहे व दिपरत्न नाखले यांनी व्यक्त केला.

यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष विशाल गावंडे यांनी संघटनेने माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे, तो सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन!

विशाल गावंडे यांची तालुका अध्यक्षपदी, तर नंदन भगत यांची तालुका सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल नितेश काळबांडे, नितीन कांबळे, योगीराज पाटील, दीपचंद जुमडे, श्रीकृष्ण भस्मे, पवन झटाले, प्रकाश बनसोड, गोपाल मुन, राजू थुल, प्रवीण हुमणे, आर. पी. थुल, राजेश नंदागावली, संजय पाटील, विशाल बहादुरे, धर्मदास अढावू, संजय गावंडे, अनिल वानखेडे यांच्यासह विविध कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संघटनात्मक एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष या त्रिसूत्रीच्या माध्यमातून वर्धा तालुक्यात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्य अधिक व्यापक व सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 4 1 3 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे