Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसाहित्यगंध

मेट्रोच्या प्रवासाने आनंदली मुले

स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, जि. पुणे मुख्य सहसंपादक साप्ताहिक साहित्यगंध

0 4 8 2 5 1

मेट्रोच्या प्रवासाने आनंदली मुले

सहलीची बस स्वारगेट स्टेशनबाहेर थांबली व आम्ही सर्वजण स्टेशनमध्ये शिरलो. मेट्रो प्रवासाचं खरंतर मनावर थोडं दडपण होतं. तिकीट काढणे, एंट्री व एक्झिटसाठी तिकीट स्कॅनिंग करूनच पुढे जाणे, १५-२० एक्सलेटरवरून जाणे. जमिनीखालील व पुलावरील मेट्रोत बसताना गाड्यांची अदलाबदल… हे सगळं करत असताना मुलांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार होते. पण तरीही मुलांना मेट्रो प्रवासाचा अनुभव द्यायचाच असे ठरवले. सोबत जि.प. प्राथमिक शाळा कुंभारगावच्या बसमधीलही मुले होती. त्यांचे शिक्षक, आमच्या बसमधील शिक्षक समन्वय साधून नियोजन करत होते. सुरुवातीच्या दोन एक्सलेटरवरून जाताना फक्त मोठी मुले आधी पाठवली. बाकीची लहान मुले जिन्याने खाली उतरली. त्यानंतर तिकीट घेतले. प्रत्येकाचे तिकीट वेगळे. दोन्ही बसमधील मुले व शिक्षक मिळून १३० तिकीटे काढावी लागणार होती. त्यात वेळ गेला. पुढे जाण्यासाठी तिकीट स्कॅनिंग करून जायचे. तिथेही मुलांवर लक्ष ठेवावे लागणार होते. नाहीतर एंट्री करताना पायाला इजा होईल याची काळजी.

पण यावेळी मेट्रो कर्मचाऱ्यांनी खूप सहकार्य केले. त्यांनी स्वतः स्कॅनिंग करायला मदत केली. आम्ही फक्त मुलांवर लक्ष ठेवून त्यांना सावकाश पुढे सोडले. त्यापुढील एक्सलेटरवरून आणखी काही मुले सोडली व काहीजण जिन्याने. प्रत्येकवेळी जिन्याने न्यायचे तर आधीच मुले दिवसभर प्रवास व सहल यात मुले दमली होती. आणखी जिने चढणे उतरणे सोयिस्कर वाटेना. मग मात्र आम्ही लहान मुलांनाही एक्सलेटरवरून पाठवायचे ठरवले. दोन शिक्षक मुलांना एक्सलेटरवर सोडताना थांबले व पुढे दोघेजण बाजूला घेण्यासाठी थांबले. काही मुले सूचनेनुसार पाय देऊन पुढे जात होती पण काही मुले घाबरत होती. तर काही ‘आम्हाला तुमच्या सोबत न्या ना मॅडम’ अशी म्हणू लागली.

सगळ्यांनाच सोबत कसे घेणार? यावेळी बऱ्याच प्रवाशांनी आम्हाला सहकार्य केले नि एकेका प्रवाशासोबत एकेक मूल पाठवायला सुरुवात केली. बाजूला घेण्यासाठी पुढे शिक्षक होतेच. एकदाची सर्व मुले पुढे आली आणि हुश्श वाटलं. आता दुसऱ्या एक्सलेटरवरून जाताना आम्ही फक्त जवळ उभे राहिलो मुले पटापट आम्ही जातो म्हणत जाऊ लागली. दोनवेळा सराव झाल्यावर मुले खूप आनंदली. आम्हाला आता एक्सलेटरवरूनच जायचे खूप मजा येतेय असे म्हणत पटापट जायला लागली. त्यांचा तो आत्मविश्वास व आनंद पाहून खूप समाधान वाटले. प्रत्यक्षात मेट्रोत बसणे, प्रवास करणे, पुन्हा बाहेर पडणे, पुलावरील मेट्रोतून खालील शहराचा नजारा पाहणे. हे सगळंच मुलांना खूप खूप आवडले.

मेट्रोतून खाली पाहताना मुले म्हणू लागली, “असं वाटतंय आपण आकाशातूनच उडतोय”. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून मनापासून वाटलं.. बरं झालं आपण मुलांना इकडे घेऊन आलो. यावेळी मेट्रो कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य खरंच खूप मोलाचे होते. प्रत्येक ठिकाणी त्यांचे तीन चार कर्मचारी सहलीची मुले म्हणून मदतीला तत्परतेने येत होते. त्यांच्या या सहकार्य भावनेस मनोमन सलाम. मदत करणाऱ्या मेट्रो प्रवाशांचेही धन्यवाद.

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, जि. पुणे
मुख्य सहसंपादक साप्ताहिक साहित्यगंध
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे