ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनखानदेशमहाराष्ट्रसाहित्यगंध
आपलं स्थान
सीमादेवी बेडसे ता. चाळीसगाव, जि. जळगाव

0
5
7
8
9
8
आपलं स्थान
माय तुझ्या-माझ्या अंतरी, प्रेमाचा अखंड धागा।
नियतीने जो विणला, न तुटे कधीच जागा॥
रक्ताची नाती कधी, संशयाने डळमळती।
मनाच्या या नात्याला, विश्वासाचीच संपत्ती॥
भेटीगाठी नसल्या, तरी नाते कमी न व्हावे।
श्वासामधल्या श्वासापरी, एकमेकांतच राहावे॥
लोक करतील प्रयत्न, दूर आम्हां नेण्याचे।
हृदयातील हे स्थान, कोण बळे पुसण्याचे॥
दृष्टीआड झालो जरी, मनाआड कधी न व्हावे।
जन्मोजन्मीचे हे बंध, ईश्वरानेच जपावे॥
तू माझी, मी तुझी, एवढेच सत्य पुरे।
जग सारे विरुद्ध असले, प्रेम न कधीच सरे॥
माय, तुझ्या-माझ्या नात्याला, काळाचाही स्पर्श न व्हावा।
हृदयातल्या या स्थानाला, अनंताचा आशीर्वाद लाभावा॥
हृदयातल्या या स्थानाला, अनंताचा आशीर्वाद लाभावा॥
सीमादेवी बेडसे
ता. चाळीसगाव, जि. जळगाव
===========
0
5
7
8
9
8



