जे. एस. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जे. एस. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (दि १३ जाने) : जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथे राष्ट्रीय युवा दिन तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे (दि १२) आयोजन करण्यात आले.
यामध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम, रन फॉर स्वदेशी – रन फॉर अँन्टी ड्रग रॅली, “युवकांसाठी स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार” या विषयावर मार्गदर्शनपर व्यख्यान इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी सर्वांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम महाविद्यालयातील कार्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील व उपप्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
त्यानंतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर लायन्स क्लब, अलिबाग व विधी साक्षराता प्राधिकरण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रन फॉर स्वदेशी – रन फॉर अँन्टी ड्रग रॅली अलीबाग शहरातून काढण्यात आली. सकाळी ठिक 9:30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून रॅली सुरु करण्यात आली. सदर रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, अलिबाग बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी नाका, सिव्हील हॉस्पीटल ते अलिबाग समुद्र किनारा या मार्गावरून काढण्यात आली.
यामध्ये जे.एस.एम. महाविद्यालयाचे एन. एस. एस. स्वयंसेवक व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वदेशीच्या व अंमली पदार्थविरोधी घोषणा दिल्या. रॅलीची सांगता अलिबाग समुद्रकिनारा येथे करण्यात आली. राष्ट्रीय युवा दिन तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त “युवकांसाठी स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार” या विषयावर मार्गदर्शनपर व्यख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पंकज घरत यांनी “युवकांसाठी स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी मनोगतात स्वामी विवेकानंद यांच्या जिवनातील काही प्रसंगाचे दाखले देऊन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासठी जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची पराकाष्टा करावी तसेचे परस्त्री मातेसमान तत्व अंगीकारावे असे सांगितले. ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांना जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी ज्ञानसाधना, ध्यानधारणा व अध्यात्माचा मार्ग स्वीकारावा. तसेच डॉ. पंकज घरत यांनी राजमाता जिजाऊ यांचे विचार व त्यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले.



