0
4
8
2
8
4
आस प्रेम सावलीची
दुपारची वेळी भास तुला
लागली आस प्रेम सावलीची
मोहक तुझी प्रती कृती
असेल बरोबर प्रीतीची
अनुबंध तुझ्या प्रेमाचे
नात्यातील भाव गोडीचे
जोड देता कर्तुत्वाचे
त्याच्या जीवनी साफल्याचे
तुझ्या प्रेमाचा रंग गुलाबी
रंगात रंग मिसळून येते लाली
जीवन जगण्याचा मकरंद
आयुष्याच्या सुखात नाहली
आसवांच्या मेघ पापण्यात
स्मृतीत रंगताना दाटतो
सरंजाम वैभवाचा भवताल
तरी अंधार हृदयात साठतो
जुन्या स्मृतींना स्मरून जेव्हा
रंगविली माझी अबोल काया
तुझ्याविना अपुरी वाटे तेव्हा
मिळणारी ही ओसाड माया
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
4
8
2
8
4



