0
4
8
2
8
6
हिरवा निसर्ग
पाऊसधारा बरसताच
झाला हिरवा निसर्ग
हिरवे झाले रान
वाटे जणू स्वर्गच
खाई, वनराई, आमराई
सारेच झाले मनमोहक
हिरव्या हिरव्या सौंदर्याचे
दृश्य दिसते नेत्रदीपक
राने, कुरणे,माळराने
झाली ओलीचिंब
साचलेल्या पाण्यामध्ये
सुंदर दिसते प्रतिबिंब
हिरवा निसर्ग बघून
ओठी येतात गाणी
पक्षीही गाताना बघून
आनंदाने हसते वनराणी
अर्चना राजू ईंकने
लाखांदूर,जि.भंडारा
=================
0
4
8
2
8
6



