Breaking
चारोळीनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 8 2 3 9

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*

*🌤️विषय : आई असल्यावर🌤️*
*🔹गुरूवार : ०६ / ०८ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध २३० साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आई असल्यावर*

दूर राहता तिच्यापासून
जीव आतल्याआत जळतो,
प्रेमाचा घास फक्त
आई असल्यावर मिळतो..

*कुमारी साक्षी दत्तात्रय देसाई, दौंड, पुणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

तव्यावरची गरम गरम भाकरी
आई असल्यावर आपल्याला मिळते
तिच्या प्रेमाची,काळजीची किंमत
ती निघून गेल्यावर आठवणीत कळते..

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

आई असल्यावरच आहे
निःस्वार्थ प्रेम माया खरी
अर्धपोटी राहून लेकरांना
वाढते ती पोटभर भाकरी

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

*आई असल्यावर*
*सारं मनासारखं घडतं*
*ती नसल्यावर मात्र*
*पूर्ण गणितच बिघडतं*

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक*
*ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*सर्व विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २३० साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

आई असल्यावर तिच्या असण्याला गृहीतच धरलं
मातिआड झाली आई हृदय हादरलं…
प्रेमाची भाकर,निस्वार्थ माया मिळणार नाही आता
आई तुझ्यासारखे थोरत्व कुठे शोधू जगता

*सौ सुरेखा कोरे*
*जिल्हा नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

आई असल्यावर भाकरीलाही गोडवा येतो,
तिच्या हातचा घास जीवाला आधार देतो…
जगात कितीही सुख मिळाले तरी,
आईच्या मायेपुढे सर्व काही फिके पडते…

*श्रीमती सीमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह…*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

आई असल्यावर घरच मंदिर दिसे
आईच्या नुसत्या स्पर्शीणे शिन जाई
आई पुढे मी आजुनही लहान बाळ
आई पुढ स्वर्ग सुख ही पडे फिके

*नरेंद्र साबळे*
*ता गंगाखेड जि परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आई असल्यावर*

आई असल्यावर भाकरीलाही गोडी येते,
रिकाम्या ताटातही मायेची चव राहते.
उपाशी राहूनही हसत घास भरवते वारंवार,
आई असल्यावरच जगणं होतं साकार.

*मनोज परसराम शिंदे*
*ता पालम जिल्हा परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*…

माझी आई अन्नपूर्णा, तिच्या भाकरीची चवच न्यारी,
तिच्या मायेने खुलत असे सुखांची बहरलेली वारी.
आई असेपर्यंत भरून वाहतात आनंदाच्या घागरी,
ती गेल्यावर मात्र आयुष्यभर सोबत राहते दुःखाची दरी…

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

आहे ती लेकराची माऊली
भय कसले आई असल्यावर
वाळवंटात आहे ती सावली
श्वास असतो तिचा आम्हावरी

*कुसुमलता दिलीप वाकडे*
*नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

आई असल्यावर
साऱ्या जगाची अनुभूती होते
संस्कार, प्रेम मोह माया आपुलकी
तिच्याच पदरात असते

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

आई असल्यावर कायम
कुणालाही येईना थकवा,
येणाऱ्या आमिषांना खरं
आईमुळे मिळतो चकवा.

*रविंद्र भिमराव पाटील*
*चोपडा,जि.जळगाव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

आपल्या स्वप्नांसाठी
झटणारी प्रेम करणारी
आपली आई असल्यावर
दुनियाच वाटते ती जादुगरी

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️
*आई असल्यावर*

आई असल्यावर मिळतो
तिच्या कुशीत विसावा
आईच्या मायेचा पदर
प्रत्येकाच्या डोईवर असावा

*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🔹🌈♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 8 2 3 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे