0
4
8
2
9
3
उपाशी ओठ
उपाशी ओठ गं माझे
ओलावा प्रेमाचा दे ना
मधुगंध गं चाखविण्या
मिठीत मजला घे ना
उपाशी ओठ शुष्क
फाटली गुलाबीकडा
लाली उमटव चक्क
रंगवून पानांचा विडा
चुंबनांची गं बरसात
पेटली आग मस्तकी
मुक्त कर ते मधुकुंभ
दाटली कशी कंचुकी
उपाशी ओठ उतावीळ
पीळ मादक सिंहकटी
मदनवारा घालता शीळ
धावत ये तू सागरतटी
प्रेमनौकेत गं पाहू लेण्या
बेधुंद होऊन गं रंगमहाली
देहशिल्प मिठीत घेण्या
एकमेकांच्या करू हवाली
संग्राम कुमठेकर,लातूर
==========
0
4
8
2
9
3



