Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

वसुधा नाईक, प्रतिनिधी

0 6 1 1 8 9

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

वसुधा नाईक, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

पुणे :संजीवन विचारांची पेरणी करणारे राज्यस्तरीय मासिक शिक्षण संजीवनी परिवार, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६ आणि उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार – २०२६ या पुरस्कार सोहळ्याचे नुकतेच पत्रकार भवन, दुसरा मजला, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. संपादक देविदास लिमजे व कार्यकारी संपादक डॉ. संजय जगताप व संपादक मंडळ यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध लेखक मा.श्री. एकनाथ आव्हाड होते. प्रमुख अतिथी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या कार्यवाह स्वाती महाळंक होत्या. उपस्थित अतिथी मध्ये शिक्षणतज्ञ, सुमपदेशक आणि लेखिका मा. माधुरी गोखले, ज्येष्ठ लेखक मा. दिलीप गरुड, मा. दिलीप फलटणकर, मा. भालचंद्र कुलकर्णी, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवअधिकार राज्य संघटना, मा. अविनाश सकुंडे, श्रुती कुळकर्णी हे होते. प्राचार्य श्याम भुर्के, चंद्रकांत शहासने, दीपक जेवणे हे सन्माननीय कार्यक्रमास उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध भागांतून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा तसेच साहित्य क्षेत्रात दर्जेदार साहित्यनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षण संजीवनी राज्यस्तरीय मासिक सप्टेंबर अंकाचे तसेच डॉ फकीरा राजगुरू यांच्या ‘विद्यार्थी घडविताना’ या पुस्तकाचे तसेच राजेश लोंढे यांच्या कथा एका अर्धवट हनिमूनची या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६ अंतर्गत विविध शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व नाविन्यपूर्ण कार्याबद्दल गौरविण्यात आले. यामध्ये सविता गायकवाड
, प्रा. गौरव नेवसे, सुशील अंभोरे (पाटील), दिलीप पवार, भाग्यश्री सुपनेकर, रुपाली गुरव, डॉ. सुजाता नवनाथ, शुभांगी पवार, डॉ. फकिरा राजगुरू, श्रीम. शमा घोडके, अस्मिता क्षिरसागर, रविंद्र जोशी, स्वाती दिवाण, सीमा माने, निलिमा नरके, अमर क्षीरसागर, उदय गुरख, दिपाली शेडगे, अविनाश खरे, राघवेंद्र गणेशपुरे, सुनंदा जाधव, सौ. दर्शना मुकणे, राजेंद्र सानप, प्रो. सुनिल बच्छाव, सुनिता वाव्हळ, ज्ञानोबा मुळीक, प्रविण जमधाडे, ज्ञानेश्वर गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.

तसेच उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार – २०२६ अंतर्गत विविध साहित्य प्रकारांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये
डॉ. बाळ परांजपे, भारत सातपुते, सचिन बेंडभर, शुभदा अभ्यंकर, जयमाला चव्हाण, उत्तम सदाकाळ, प्रभा वाघ, पोपट निकम, चंद्रलेखा बेलसरे, वसुधा नाईक, नीला चित्रे, नागनाथ घाटुळे यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता मराठे यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक संजय जगताप यांनी केले. त्यांनी शिक्षण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांतील सर्जनशील कार्याची समाजाच्या जडणघडणीत असलेली भूमिका अधोरेखित केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सतीश सातपुते यांनी केले. शेवटी उज्वला जगताप यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली. मेधावी स्वप्निल काशिद या बाल नृत्यांगना ने गणेश वंदना व कालिका माता गीत सादर केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिक्षण संजीवनी मासिक परिवारातील पदाधिकारी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पुरस्कारामुळे शिक्षक व साहित्यिकांना त्यांच्या कार्याची नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 8 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे