Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरविदर्भ

‘शक्ती अभियान’ अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी, नागपूर

0 4 8 2 8 4

‘शक्ती अभियान’ अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

शहरातील महिलांचे सक्षमीकरण आणि आरोग्यासाठी अभियान

जिल्हा प्रतिनिधी, नागपूर

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर (दि २५): शहरातील महिलांच्या आरोग्याचे महत्त्व ओळखून, त्यांना सशक्त करण्याच्या उद्देशाने ‘शक्ती अभियान’ (Shakti Abhiyan) अंतर्गत दक्षिण नागपूर येथे एका भव्य निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजसेविका सौ. रोमा चिराग चौधरी यांच्यामार्फत आयोजित या शिबिरात महिलांसाठी विशेषतः निशुल्क ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आणि सर्वांसाठी निशुल्क डोळे तपासणी शिबिराचा समावेश होता. सोबत माफक दरात पूर्ण बॉडी चेकअप सुद्धा उपलब्ध करून दिले.

शिबिराचे मुख्य उद्दिष्ट

महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करणे ,”स्त्री आरोग्य – समाजाची ताकद” हा संदेश प्रसारित करणे , स्तन कर्करोगाचे वेळेत निदान करून सुरक्षित भविष्यासाठी मार्गदर्शन करणे , गरजूंना मोफत डोळे तपासणी सेवा पुरवणे. शक्ती अभियान’ हे महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि राजकारणात त्यांचे स्थान बळकट करण्यासाठी कार्यरत आहे.

दक्षिण नागपुरातील प्रभाग क्रमांक २७ मधील विविध ठिकाणी (बापू नगर) परिसरात सर्व नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, या संधीचा लाभ घेऊन आपले आरोग्य तपासणी करून घेतली , आयोजकांमध्ये खेमराज गोमासे , अजय वानखेडे , चंद्रशेखर चौधरी , मुस्कान इंगोले , प्राची चौधरी , ऋत्विक राऊत, विशाल मानमोडे, बापू नगर हनुमान मंदिर पंचकमेटी तसेच स्वामी विवेकानंद सेवा संस्था इत्यादींनी पुढाकार घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे