मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*????संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा????*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????स्पर्धेचा विषय : कासवगती????*
*????मंगळवार : १७ / डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*कासवगती*
कासवगती कासवगती
असते ग आई काय?
सगळेजण मला का हसती
मला समजत नाय
असू दे काहीही
मला देणं घेणं नाही
तू प्रेमाने समजावतेस
कोणी म्हणो काही
अभ्यास मी करत असतो
करतच ग राहणार
एक दिवस बघ राजा मी
सगळ्यांचा ग बनणार
समजून घेतात मला बाई
ऐकून घेतात म्हणणे
मला तर ऐकूच येत नाहीत
इतरांचे मग टोमणे
आई नी बाई प्रिय माझ्या
मी लढाई जिंकणार
एक दिवस बघ आई
उंच आकाशी झेपावणार
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*कासवगती*
नेहमीच आपल्याला कासवगती
हळूहळू खुप उंचीवर घेऊन जाती..१
कासवगतीनेच कामाचे सातत्य ठेवा
माझ्या कामात प्रगल्भता दे रे देवा…२
कासवगतीच आपल्याला तारते
गडबडघाई अचानक घात करते…३
कासवगतीचे काम टिकाऊ असते
ते कायम आपल्या हृदयी ठसते….४
स्पर्धेसाठी काहीच नका करू
कासवगतीच्या प्रगतीचाच हात धरू…५
विचारपुर्वक सावकाश केलेले काम
कालांतराने नक्कीच करते सलाम…६
कासवगतीचे विचारच पक्के यश देतात
तेच आपल्याला संयमाचा सल्ला देतात…७
कासवगतीनेच करा प्रगती
कायमस्वरूपाची होईल उन्नती…८
कासवगतीनेच वाढवा कर्तृत्व किर्ती
सर्वांच्या हृदय गाभाऱ्यातील बना मुर्ती…९
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*कासवगती*
नको कुणाशी शर्यत
ती जिंकने हरण्याची,
तयारी असावी फक्त
स्वत:सिद्ध करण्याची…
कासवगती येई कामी
सातत्य कायम ठेवावे,
ससे येतील जातील
आपले चालत राहावे…
प्रयत्नशील रहा सदा
मार्ग नक्की सापडेल,
प्रयत्नांती तुझे तुला
कष्टाचं फळ मिळेल…
आपण आपले सिध्द
नको कुणाचे उपकार,
होईल जीत किंवा हार
स्वतः ठेवा जबाबदार…
कासव सश्याची गोष्ट
बदलत गेलीय आता,
दोघेही सोबत चालूया
त्यांनी सोडलाय गुंता…
कासवगतीने तरीपण
प्रयत्न आपले करावे,
कास धरावी सत्याची
कुणाला ना हिनवावे…
*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*कासवगती*
लहानपणी ऐके गोष्टी
ससा आणि कासव
ससा चाले तुरूतुरु
कासव हळूहळू चाले
कासव हळूहळू चाले
जिंकले कासव गती
कासवाची असे गती मंद
तो न राही सुस्त वाती
तो राही पाण्यात
तो आहे जलचर
तो चाले जमिनीवर
तो आहे वनचर
कासव असे लक्ष्मीचे प्रतीक
असे कासवाला मान सन्मान
राग,लोभ, मोह दूर करी
मंदिरात प्रवेशद्वारात देई दर्शन
जरी असले अनेक संकटे
न दगमगता देई लढा
जिंकेल प्रयत्न करूनी
हाच शिकवला धडा
*कु.कशमीरा उल्हास गुप्ते*
*डोंबिवली,मुंबई*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*कासवगती*
कासवगती माझी चाल
चालत असतो हळूहळू
राहत असायचा मी मागे
पण लागले मला कळू
नाही रे बाबा राहायचे नाही मागे
सारेच जातात निघून
चालायला लागलो मी जोराने
पाहीले मी थोडा अजमावून
कासवगतीने कामे नाही होत
प्रगती आपली खुंटतो
वर्तमानाचा जमाना आला
आपण कुण्या जगात जगतो!
आई बाबांचा पूराना जमाना
नव्या तरूणाईचा नवा जमाना
आपण का रहावे मागे
हे सांगू आपण सर्वांना
छला मुलांनो जोरा जोराने
खेळू आपण सर्व आनंदाने
दृत गतीने शिका चालायला
बनवा गतिमान जिवनाला
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*कासवगती*
सुमित वर्गातील
सामान्य मुलगा
अभ्यासाची आवड
मेहनतीत चंगा
हुशार मित्राइतके
यावे मला ज्ञान
कष्ट करून जास्त
मिळवी गुण छान
निरंतर मेहनत
थांबला ना कुठे
कासवगती चालुन
गेला अभ्यासात पुढे
जिद्द,मेहनत,चिकाटी
कामी आली जीवनात
व्यक्तीमत्व घडविले
यश मिळवले हातात
उंच उंच उड्या मारून
मध्येच थांबणे नव्हे बरे
संथ चाल कासवगतीने
निरंतर यश मिळे खरे
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*कासवगती*
कासवगती जरी माझी
हलक्यात नका रे घेऊ
भल्याभल्यांची राजेहो
उडवलीय झोपही भाऊ
नसेल गती जरी अभ्यासात
मैदानावर माझीच चलती
वाचन लेखन अडखळे पण
पहा मंचकावरील प्रगती
ऐकीव माझे आहे खासच
आकलनही आहे भारी
तोंडपाठ कविता साऱ्या
नाटकाची उंच भरारी
आवडीनिवडी हरेकाच्या
सर्वगुणसंपन्न कोण आहे
कौशल्य व क्षमतानुसार
पसंतीक्षेत्र चाचपून पाहे
थांबला तो संपला येथे
मंत्र पक्का आहे ध्यानात
आत्मविश्वासाच्या बळावर
कासवगतीने करीन मात
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*कासवगती*
एक होती सुमती
तीची मती कासवगती
वेडा बाईला काही कळेना
शिकवलेले पाढेही वळेना
दिसायला होती टापटीप
पण अभ्यासातच होती ढेप
हात टेकले आई बाबांनी
खुप शिकवले गुरुजींनी
गुरुजी तीच्या मनाने वागले
कासवगती मन तीचे धावले
पटापट येऊ लागला अभ्यास
सुमती झाली सर्वांची खास
*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*कासवगती*
आई म्हणते मला,बाळा
पुरे झाली, कासव गती,
पोरं जातील, पुढे पुढे
वाढव,अभ्यासाची गती.
आईला माहित नाही
गोष्ट ससा,कासवाची,
जो जास्त, धाव,धावतो
फसगत होते त्याची.
फुशारकी,न मारता
अभ्यास करीन खूप,
दमून दमून सश्याने
झोप घेतली खूप.
त्याच्या सारखा चपळ
पळण्यात होता तोच,
गर्वांचे घर असते खाली
कळली,बुद्धिची पोच.
असली जीवनात जरी
कधी कधी कासवगती,
आपले ध्येय गाठण्या
करावी तुम्ही द्रूतगती.
*मायादेवी गायकवाड, मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*कासवगती*
कासवगती माझी जरी
नका बरं काहीही बोलू
एक दिस मिटविन दरी
प्रश्न पुढे का गेला गोलू?
माझी आईच आहे बरी
प्रेमाची ती करते बरसात
अंगणात रे खेळतो तरी
उभी राहते तीही परसात
गोंजारून मायेनं रे आई
बनते ती शाळेतली बाई
शिकविण्याची नाही घाई
खूप काही शिकविते ताई
कासवगतीने मी चालतो
ध्येय निश्चित मी करून
स्वप्नमाळ रे मीच माळतो
पाहाल तुम्हीच रे दुरून
मनातून अभ्यास करून
आकाश घेतलं मी कवेत
कासवगती गेली मरून
बाता करत नाही रे हवेत
बाता करत नाही रे हवेत
✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.????*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन /मुख्य प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



