Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 4

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट वीस🎗🎗🎗*

*🌤️विषय : गंध सांगून गेला🌤️*
*🔹गुरूवार : २७ / ०३ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुख्य संपादक राहुल पाटील 7385363088 यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी.*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

तुझ्या काळजातला विरह
निशिगंध मज सांगून गेला
अश्रुंच्या सिंचनाने सखे तू
त्यास अभिषेक ग घातला

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

तू माझिया प्रीतफुला
गंध सांगून गेला…
गंधीत या मनाला
रुप तुझा बिलगून गेला…

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

माळावरच्या फुलांचा
गंध सांगून गेला
याच वाटेवरती
प्रेमरंग उधळला.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

व्हावे मिलन तुझे नि माझे
फुलांचा गंध सांगून गेला
सुगंध प्रीत आठवणींचा
अजूनही दरवळत राहिला

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

*येना जराशी मिठीत तू*
*गंध सांगून गेला मनाला*
*करून बहाने उगीचच*
*किती छळतेस या क्षणाला*

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

गंध सांगून गेला
चांदण्यात सांडून
हृदयात खोल कुठे
हळवे क्षण लपून

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

गंध सांगून गेला काहितरी
तुझे नी माझे जुळेल नाते
प्रेमाचे सुंदर प्रितीचे धागे
बहरून येईल सुंगधी बंधते

*सौ पुष्पा डोनीवार,चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

*विरहाच्या झळा*
*छळतात मजला*
*येणार तू नक्कीच*
*गंध सांगून गेला*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

गंध सांगून गेला तुझे असणं,
हात न लावता स्पर्श करणं,
क्षणभंगुर, तरी दीर्घ ठसा,
सुगंधात लपलेला आठवणींचा घसा.

*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

तव कर्तृत्वाचा दरवळ
अलगद इथे दरवळला…
मार्ग इथेच हिरवळला
ते मज गंध सांगून गेला ….

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

प्राजक्ताचा गंध सांगून गेला
साजन येणारं तुझ्या भेटीला
सांडले मी त्याच्याच पायदळी
तू सखये एव्हढी झालीस का खुळी

*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

दरवळणारा हा सुगंधीत
मज गंध सांगून गेला
नको बघू तू या जगाकडे
फुलव बिनधास्त प्रीतीला

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

फुलांचा गंध सांगून गेला
आपल्या प्रीतीची कहाणी
अवचित आला माझ्या राजा
स्वप्नमहाली तुझीच मी राणी..

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दा.न.ह.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

गंध सांगून गेला मातृत्वाचा
जपशील नाता माणुसकीचा
गरजूंना देशील हात मदतीचा
हृदयात जपशील झरा मानवतेचा

*अनिल मेश्राम,सौदड, जिल्हा गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

तुझ्या आठवांचा स्पर्श सख्या
अलवार हृदयांतरी विसावला
येणार मज वास्तवात भेटीला
हा फुलांचा गंध सांगून गेला…

*सौ.आशा कोवे- गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

मिटण्याआधी नयनपाकळ्या
रंग जीवनाचे जगून घे..
गंध सांगून गेला फुलांचा
परतून येणार नाही क्षण हे..

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

तुझ्या माझ्या प्रेमाचा
आज गंध सांगून गेला
कशी काय जपावी प्रीत
पांघरून सुखाचा शेला

*सचिन पाटील*
*(अलिबाग, रायगड)*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

श्वेतपुष्पातुनी श्वास तुझा
आठवणीत पाझरुन गेला…
प्रीतफुला कातरवेळी असा
तुझा गंध सांगून गेला….

*प्रविण पाटील रत्नागिरी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

तू येण्याचा आभास मला
वेळेचा कुठे मागमूस तुला
परतीच्या वाटेवर मी निघता
तू आल्याचे गंध सांगून गेला

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
*गंध सांगून गेला*

मोगराही फुलला
कोवळ्या पानांनी
गंध सांगून गेला
पहाट वार्‍यानी

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🪷🍂➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे