0
4
8
2
9
7
असंही घडते कधी कधी
जीवन कधी का कुणा कळले
कधी कुठे ते कसे वळले
अमाप सुखाने कधी सळसळले
अपार दुःखाने कधी हळहळले ॥
कर्म आपले करीत रहावे
फळासाठी ना कधी रुसावे
विश्वास ठेवुनी कर्तुत्वावर
विश्वासघाताने कधी होरपळले ॥
अनाकलनीय घटना काही
घडून जातात जीवन प्रवाही
ओढून काळ थांबवावा आधी
असंही घडते कधी कधी ॥
नियतीलाही कैद करावे
काळासही मूठबंद करावे
मृतात्म्यातही प्राण ओतावे
अशक्य ते शक्य करावे ॥
असंही घडते कधी कधी
निसर्गचक्राचा खेळ सारा .
समतोल राखण्या ब्रम्हांडात या
बदलास मिळतो इथे थारा ॥
असंही वाटते कधी कधी
‘मी ‘ तून ‘ मी ‘ निघून जावे
वारा बनून मुक्त फिरावे
नदी बनून खळखळ वहावे ॥
वाफ बनूनी ढगात जावे
पाणी बनूनी मातीत मुरावे
माती बनुनी पुन्हा जगावे
असंही घडते कधी कधी ॥
सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ
0
4
8
2
9
7



