0
3
4
5
9
0
कानोकानी
नको भाषा
कानोकानाची,
वेळ एकमेकास
समजण्याची .
समजून घेऊ
एकमेकास,
वारसा देऊ
समोरच्यास.
समोरच्याने
घेतला वारसा ,
ऐकून दावी
त्याला आरसा .
कानोकानी ऐकून
सारासार विचार करून ,
निर्णय दिला
समोरच्याला .
समज द्या स्वतःला
कानोकानी भाषा ,
स्वैरभैर करी कुटुंबाला
वापरा एकोप्याची भाषा…..
वापरा संगनमताची भाषा…..
सौ.माधुरी हेमराज लांजेवार
मु.नागपूर, ता.नागपूर, जि.नागपूर
0
3
4
5
9
0