भारतमातेच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आवास मध्ये उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी
भारतमातेच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आवास मध्ये उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: गुरूवार दि. १५ अॉगस्ट २०२४ रोजी आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, आवासच्या शैक्षणिक संकुलात आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर काॕलेज, पूर्व प्राथमिक व स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा यांनी भारतमातेच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून व सुनियोजनातून उत्साहात साजरा केला.
सर्वप्रथम प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. १२ वीच्या विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने लेझीम प्रात्यक्षिक करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे सभासद परशुराम म्हात्रे यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम व इ. १० वी अ मधील विद्यार्थी राज पोवळे यांने परेड करून आमंत्रित केले व सभासद परशुराम म्हात्रे यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर यतिश शिंदे सर व विशाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनीनी झेंडा गीत सादर केले.
त्यानंतर प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ९ वी व इ. १० वी च्या विद्यार्थी – विद्यार्थीनींच्या पथकाने संचलन करून राष्ट्रीय ध्वजाला व मान्यवरांना सलामी दिली. विशाल पाटील सर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. त्यानंतर प्रतिज्ञा म्हणण्यात आली व सर्वांनी तिरंग्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे सभासद परशुराम म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे उपसेक्रेटरी त्र्यंबक फाटक, सभासद दिपक राऊळ, सभासद जयवंत म्हात्रे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक/माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, माजी जेष्ठ शिक्षक महादेव कोळी सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सुनिल मोरे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, पूर्व प्राथमिक शाळा प्रमुखा रणिता म्हात्रे मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अजित नाईक सर यांनी केले.
विद्यालयातील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची शाळेपासून ग्रुप ग्रामपंचायत, आवास पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभातफेरी मध्ये देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. आपल्या भारतमातेचा जयघोष करण्यात आला.
प्रभात फेरी ग्रुप ग्रामपंचायत, आवास येथे पोहोल्या नंतर सर्व प्रथम प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. १२ वीच्या विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने लेझीम प्रात्यक्षिक करून मान्यवरांचे स्वागत केले.
त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम व इ. १० वी अ मधील विद्यार्थी राज पोवळे यांने परेड करून आमंत्रित केले व सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांनी ध्वजारोहण केले.
ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर यतिश शिंदे सर व विशाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी झेंडागीत सादर केले.
त्यानंतर प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ९ वी व इ. १० वी च्या विद्यार्थी – विद्यार्थीनींच्या पथकाने संचलन करून राष्ट्रीय ध्वजाला व मान्यवरांना सलामी दिली.त्यानंतर प्रतिज्ञा म्हणण्यात आली व सर्वांनी तिरंग्याची शपथ घेतली
या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायात, आवास माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, सर्व मा. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक जयेश पाटील, आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे खजिनदार सुवर्ण कांबळी, सभासद सुधाकर राणे, सभासद दिपक राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक/माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, माजी जेष्ठ शिक्षक महादेव कोळी सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सुनिल मोरे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, पूर्व प्राथमिक शाळा प्रमुखा रणिता म्हात्रे मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि मोठ्या संख्येने आवास ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अजित नाईक सर यांनी केले.
शेवटी सर्व उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यात आले.



