0
4
8
2
9
7
प्रश्नच पडला ?
मी अशी की तशी….
का बरे प्रश्नच पडला ?
मी जशी आहे तशी
नसेल कुणाला आवडत
पण माझीच मला आहे
मी सदैव आवडणारी
नको आवडू दे कुणाला
काय करायचे मला ?
गोरी काळी सावळी
नाकी डोळी नीटस
चपटी सुरेल भसाडी
पण माझीच मला आहे
मी सदैव आवडणारी
कधी बुद्धू कधी हुशार
असे वेडी वा समजदार
नको ताण घेऊ तेवढा
राहू दे मला जशी आहे तशी
प्रश्नच पडला ?
तर समज मला खुश्शाल…
सुगंधी परी काटेरी केवडा
वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
0
4
8
2
9
7



