Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनभंडाराविदर्भसाहित्यगंध

आधार

वनिता गभणे आसगाव, जि.भंडारा

0 5 1 8 0 2

आधार

भरभरून दिलेस देवा तू मला
सर्वकाही..
माझ्यासाठी तक्रार मुळीच करत
नाही..
पण, ज्या शाईने लिहलेस तू ‘तीचे’ प्रारब्ध,
इतर कुणासाठी वापरू नकोस ती शाई..
ज्याच्यासाठी ओलांडला तीने
माहेरचा उंबरठा
त्यानेच फिरवला तीच्या
सुखावर वरवंटा..
तीच्या सारखा नाहीच देवा
जगी या कपाळकरंटा..
तरण्याताठ्या पोरीवर
अग्निसंस्कार करणे..!
सोपे नाहीच देवा मुळी
जीत्यापणीच जन्मदात्यांना तोडणे..
नवऱ्याचा सततचा मानसिक त्रास..
व्याधीचा मनावर कसून
जखडलेला पाश..
चार भिंतीच्या आत बंदिस्त वास..
भाव व्यक्त करण्या ना कुणाचा
सहवास…
अशी कशी मांडलास देवा
तीच्या हस्तरेखांची आरास..
शांत- संयमी, निर्मळ- निरागस
मनावर असे केलास तू नियतीचे वार
की,,,
तीचा मूळ स्वभाव शोधतो आज
तीच्याच आत आधार..!!

वनिता गभणे
आसगाव, जि.भंडारा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 0 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे