0
4
0
9
0
3
स्त्री भ्रूण हत्या
स्त्री भ्रूण हत्या,एक गंभीर समस्या
स्त्री म्हणजे जन्मदात्री, साक्षात लक्ष्मी, नानाविध रुपे तुझी
नररत्नांना घडविणारी तूच आहेस
अ,आ,ई शिकविणारी तूच आहेस
तान्हुल्याला उराशी धरून
भरवणारी तूच आहेस
नऊ महिने कुशीत
सांभाळणारी तूच आहेस
तरीही जग पाहण्याआधीच
कधी काळी बळी घेणारीही तूच आहेस
बांधावरील झाडाला झुल्यात ठेऊन, झोका देऊन
शांत करणारी तूच आहेस
आंधळ्या पांगळ्यांचाही खरा आधार तूच आहेस
हे सगळं जगाला ठाऊक आहे
तरीही स्री भ्रूण हत्या का होत आहे
नसेल जगात स्री, नसेल आई, नसेल ताई
ओसाड वाळवंटात मानवाची होईल लाही लाही
अनिल मेश्राम
सौंदड जिल्हा-गोंदिया
0
4
0
9
0
3





