Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणनागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे १५ रोजी शिर्डी येथे अधिवेशन

कुही तालुक्यात संघटनेची नियोजन सभा संपन्न

0 4 8 2 9 4

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे १५ रोजी शिर्डी येथे अधिवेशन

कुही तालुक्यात संघटनेची नियोजन सभा संपन्न

शिर्डी येथे जुनी पेंशन शिलेदारांचा एल्गार

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर: दिनांक १५ सप्टेंबर २०२४ ला शिर्डी येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे पेन्शन महाअधिवेशन संदर्भाने नियोजन सभा कौशल्या सभागृह कुही येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष संजय पेशने, जिल्हा कोषाध्यक्ष आतिश कोहपरे, आरोग्य विभाग प्रमुख दीपक सहारे, जिल्हा संपर्क प्रमुख सुरज वैद्य आणि तालुक्यातील पेन्शन शिलेदार बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी संजय पेशने यांनी संघटनेची पार्श्वभूमी आणि आतापर्यंत केलेली आंदोलन यावर मार्गदर्शन केले, तर सुरज वैद्य यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना यांनी संघटना निरंतर करीत असणारे कार्य आणि चळवळीचे महत्व याबाबत मत विषद केले. आतिश कोहपरे यांनी शिर्डी अधिवेशन नियोजन याबाबत सविस्तर विवेचन केले.

याप्रंगी तालुक्यात नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. तसेच शिर्डीला होणाऱ्या महा अधिवेशना संदर्भाने सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागासह इतर विभागातील कर्मचारी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष प्रदीप मोहोड सर, संचलन नयना आकरे मॅडम, तर आभार अर्चना महाले मॅडम यांनी मानले.

आयोजित सभेच्या यशस्वीतेसाठी तालुका पदाधिकारी रतन लांजेवार, गणपत धार्मिक, हितेश रामटेके, चेतन बेलसरे, रमेश वैद्य, भोजराज सोनसरे, सुधीर वाढई, नागनाथ रुपनर, मून सर, व्यंकट मुरकुटे, मारोती जायेभाये, जयसेन कांबळे, आशुलता वाढई, हर्षालता धार्मिक, संजीवनी रोटके, कांता मुंढे, कविता आगरकर व सर्व पेन्शन शिलेदार यांनी मोलाचे सहकार्य केले. सोबतच कुही मधील प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक निखिल येळणे यांनी सुद्धा सहकार्य केले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे