Breaking
कवितासाहित्यगंध

मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’

मुख्य संपादक राहुल पाटील

0 6 4 5 4 4

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : दगडी पाटी📘*
*🔸मंगळवार : १५/सप्टेंबर /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सर्व विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २३६ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*दगडी पाटी*

काळी कुळकुळीत, वजनदार भारी,
होती आमची दगडी पाटी,
लिहिण्याची तिच्यावर मजा न्यारी,
पहिली शाळा, पहिली पाटी!

पांढरी शुभ्र, पेन्सिल भारी,
वास तिचा अजूनही येतो घ्राणी,
कधी हळूच चाखून पाहावी,
खडूची गोडी लागे भारी!

उभ्या-आडव्या रेषा रेखाव्या,
लहान-मोठे गोल काढावे,
अक्षरांची गोडी लागावी,
प्रयत्न कधी न फोल जावे!

चुकले की अलगद पुसावे,
पुन्हा पुन्हा गिरवावे,
कधी आईने हात धरावा,
कधी बाईंनी अक्षर घडवावे!

अ आ इ ई गिरवत जावे,
काना, मात्रा जोडत जावे,
अक्षरांची गोडी अशी लागली,
दगडी पाटीने अक्षरांची ओळख झाली!

*सौ. सुमन विजय शेवाळे*
*जिल्हा नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿➿
*दगडी पाटी*

जिल्हा परिषद माझी शाळा
तिचा मज असे लळा
दगडी पाटी असे सोबत
अक्षर गिरवी त्यावर हसत

लिहीत असू दगडी पाटीवर
अक्षर लेखन वळणदार
निर्मळतेचा बाणा असे पाटी
शिक्षण देई ती दगडी पाटी

दगडी पाटी असे नाजूक
करत असू आम्ही जपणूक
त्या पाटीवर प्रेम फुले
दगडी पाटी मनी खुले

अक्षर गिरवले त्यावर सुंदर
दगडी पाटी ज्ञानमंदिर
निर्मिले अक्षर वळणदार
शब्द फुलले बहारदार

नको घ्या रे मोबाइल हाती
मज हवीसी दगडी पाटी
शिक्षण घेऊ त्या पाटीवर
फुलेल हसू अपुल्या ओठावर

*श्री.पुरुषोत्तम वि.ठोंबरे*
*बंधुनगर,झिंगाबाई टाकळी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿➿
*दगडी पाटी*

दगडी पाटी चौकट लाकडी
काळाभोर रंग तिचा
नाजूक पेन्सिल चालेल तिच्यावर
सरस्वतीचा आशीर्वाद कायमचा

अ,पासून ज्ञ पर्यंत अक्षर गिरवी
एक ते शंभर अंक असे भारी
बे पासून शंभर पर्यंत पाढे
अक्षरांची जुळवाजुळव सारी

दगडी पाटी लय भारी
अंक अक्षर चुकले की पुसले
नवीन अक्षर अंक गिरवी
ज्ञानाचा वसा तिने घेतले

शाळा सुटली पाटी फुटली
आई मला माराय उठली
काठी घेऊन मागे लागली
आजीच्या पदरा आड लपली

दगडी पाटी थोड्या पाण्यात धुतली
वाऱ्यात तिला सुकवली
पुन्हा पुन्हा अक्षर लिहीत
काळ्यावर पांढरे उठवली

बालपणीचा काळ तो सुखाचा
नाही कुणाची बळजबरी
मन लावून अभ्यास करी
आनंदाने ज्ञानग्रहण लयभारी

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा, कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿➿
*दगडी पाटी*

दगडी पाटी माझी होती
पांढऱ्या पेन्सिलची लेखणी
अ आ इ ई त्या वर गिरवताना
बाई म्हणायच्या गोड गाणी..

पाटीवरती रेघोट्या काढून
शिकले अक्षर गिरवायला
चूक झाली की पुसायची
पुन्हा परत तेच काढायची…

पाटी होती काळी काळी
अक्षर, अंक, पाढे काढायचे
छान छान लिहिताना मग
त्या बरोबर संस्कारही शिकायचे….

दप्तर छोटे, स्वप्नं होती मोठी
त्या वेळी शाळा वाटे भारी
दगडी पाटीच्या आठवणींनी
आजही मनी पिंगा घालतात सरी…

मोबाईल, टॅबलेट आले बाई
आता बदलतेय सारे जग
दगडी पाटीची गोड कहाणी
मनात राहिली आजही मग…

दगडी पाटी काळी भोर छान
बालपणाची होती तीच शान,
त्या आठवणी जपून ठेवूया
होऊ त्या वेळचे धनवान….

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
*दगडी पाटी*

आठवते ती दगडी पाटी
काळी कुळकुळीत
चौकट लाकडी

काळ्यापांढऱ्या चा संगम
आयुष्य घडले असे
चंदेरी स्वप्न जसे

क ख गभ मन चछज
अक्षरे गिरवीत झालो मोठा
ज्ञानसागरा काय तोटा

एकच मागणे कधीतरी
पाटीची माया विसरू न कधी
मिळावी पुन्हा संधी

पुन्हा एकदा बालपण यावे
तेच रडणे तसेच हसणे
आनंदाचे उत्कट गाणे

*सविता धमगाये; नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿➿
*दगडी पाटी*

दगडी पाटी काळीभोर
आणि पांढरा खडू
गट्टी जमली,त्यांची फार
आले मित्र पांडू,खंडू ॥१॥

झाले त्यांचे मनमोर
लिहू लागले पाटीवर
लिहिले अंक त्यावर
एक दोन तीन चार ॥२॥

काय झालं,एके दिवशी
दगडी पाटी
आली खडू पाशी
म्हणे मी आहे मोठी ॥३॥

लागले जोशात
ते दोघ भांडू
खडू,बोलला घुशात
नात आपण तोडू ॥४॥

तू आहे काळी
मी पांढरा-सफेद
किती तू भोळी
सोड माझा नाद ॥५॥

झाली दोघांची खोटी
बोलू लागले गोड
पाटी म्हणे,मी आहे चपटी
सोडवू आपण कोड ॥६॥

गिरवू आपण अक्षर
गोल गोल वळणदार
येईल पहिला नंबर
सगळे होतील गार ॥७॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿➿
*दगडी पाटी*

अ,आ,इ,ई अक्षरांची गोडी
दगडी पाटी मज आवडी
एक, दोन, तीन, चार
शिकता शिकता होऊ हुशार

रेषा काढू, चित्रे काढू
सुंदर सुंदर अक्षरं लिहू
चूक झाली तर पुसून टाकू
पुन्हा पुन्हा सराव करू

पाटीवरती आकडे काढू
बेरीज-वजबाकी मांडू
लिहिता लिहिता ज्ञान घेऊ
नवनवीन शिकून पुढे जाऊ

वजनाला ती हलकी नसे
तरी दप्तरातून मी नेत असे
बालपणीची सुंदर आठवण
दगडी पाटीचे न होई विस्मरण

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿➿
*दगडी पाटी*

लाकडाची चौकट
जरी काळी भुरकी
वर पेन्सिलचा तुकडा
दगडी पाटी माझी लाडकी.

पाटीवर सरस्वती
हळदी कुंकू वाहून फूल
पाडव्याच्या मुहूर्तावर
शाळेत पडे पहिले पाऊल.

अक्षरे अंक लिहायचे
लिहून पुसायचे
नको खोड रबर
थुंकीने पुसायचे.

वारा फुंकर घालायचा
चिमणी पाणी प्यायची
ओली पाटी मग
लगेच कोरडी व्हायची.

बाबांची दगडी पाटी
मला जादूचा वाटला पेटा
दप्तराचे ओझे नाही
जणू संगणक छोटा .

*सौ विमल धर्माधिकारी*
*ता वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिरेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿➿
*दगडी पाटी*

एक होती पाटी दगडी पाटी
दिसायला लहान वजनदार
भावाकडून मिळाली होती
जुनी पण फारच उपयोगी

पाटी जपून वापरायची
शिकलेलं त्यावर वारंवार
लिहायचं फळ्यावरचं लिहायचं
पुस्तकातलं लिहायचं

कधी पाढे कधी बेरीज कधी
वजाबाकी कधी चित्र तर
कधी काही काही लिहिताना
मात्र खूप खूप मजा यायची

आलं की छान वाटायचं
जमलं नाही तर उदास मनानं
मोडून टाकायचं अशी होती पाटी
माझी तिनं खूप खूप शिकवलं

गरिबी काटकसर जपून
वापरणं काम झाल्यावर
आपल्या लहान भावाला
द्यायचं अशी होती दगडी पाटी

खूप खूप शिकलो पाटी नं ही
साथ दिली सर्वांजवळ मायेने
राहिली आठवते ती पाटी
बालपणीची मैत्रीण माझी

*गजवंती सुभाष विघ्ने*
*बडनेरा, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿➿
*दगडी पाटी*

आई मला एक दगडी पाटी दे ना
दगडी पाटी घेईन शाळेत जाईन
अक्षरे मी गिरवीन छान छान छान…!!

आई मला एक पांढरी पेन्सिल दे ना
पांढरी पेन्सिल घेईन अ आ इ ई गिरवीन
गिरवून अक्षर येईल माझे
छान छान छान ..!!

आई मला एक छोटासा रुमाल दे ना
रुमाल घेईन पाटी स्वच्छ करीन
चित्र त्यावर काढीन मी छान छान छान..!!

आई मला एक छोटी पट्टी दे ना
पट्टी मी घेईन पाटीवर रेषा काढीन
ओळीत पाढे लिहिन मी छान छान छान…!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 4 5 4 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे