Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

व्याख्यानमाला व्यासपीठावरून बहु माध्यमांचा वापर व्हावा; पराग काळकर

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 8 6

व्याख्यानमाला व्यासपीठावरून बहु माध्यमांचा वापर व्हावा; पराग काळकर

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे (दि.24 ऑ): “चांगल्या विचारांची खरी पेरणी व्याख्यानांमधून घडत असल्याने आपल्याकडे व्याख्यानमालांची वैचारिक परंपरा समृध्द आहे. अभ्यासू व्याख्याते आपल्या सकस विचारांची बिजे योग्य पध्दतीने रूजवतात. म्हणून विचारमंथनाचे हे कार्य सतत सुरू राहीले पाहिजे. सायबर गुन्हेगारी, आर्थिक ऑनलाईन फसवणूक , डिजीटल ॲरेस्ट, अमली पदार्थ विरोधी चळवळ असे सध्याचे ज्वलंत विषय घेऊन समाज जागृतीचे काम वैचारिक व्यासपीठावरूनच प्रभावीपणे करता येईल, पण आज अनेक माध्यमे लोकांच्या हातात असल्याने व्याख्यानांना श्रोते प्रत्यक्ष उपस्थित राहणे अवघड झाले आहे, म्हणून व्याख्यानमाला संयोजकांनी आपल्या व्यासपीठावरून बहु माध्यमांचा वापर करावा” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले,पुणे विध्यापीठाचे प्रकुलगुरू पराग काळकर यांनी केले. स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान व वैचारिक व्यासपीठ संपर्क आयाम यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या व्याख्यानमाला संयोजक परिषद उदघाटन सत्राचे प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रांत वैचारिक समुह प्रमुख दिलीपजी क्षीरसागर, लेखक व व्याख्याते रवींद्र मुळे, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीरजी काळकर, सचिव रवींद्र शिंगणापूर हे मान्यवर उपस्थित होते. भावे हायस्कूलच्या प्र. ल. गावडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात व्याख्यानमाला संयोजकांना मार्गदर्शन करताना पराग काळकर पुढे म्हणाले,आजच्या परिषदेत शहरी भागासह ग्रामीण भागातले संयोजकही उपस्थित आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने यूट्यूब, फेसबूक, वाॅटसअप. अशा मल्टीपल डिजीटल प्लॅटफार्मवरून अभासी पध्दतीने श्रोते बहुसंख्येने जोडले जाऊ शकतात याचा विचार करून संयोजकांच्या एकत्रिकरणातून व्याख्यानमालांमध्ये काय नविन प्रयोग करता येतील, येणा-या आडचणी कशा सोडवता यातील, चांगले विषय आणि चांगले व्याख्याते यांची जोडणी कशी करता येईल याबाबत साधक बाधक चर्चा करता येईल तसेच आपल्या व्यासपीठांचा उपयोग समाजहित आणि राष्ट्रहिताचा संदेश पोहचवणे यासाठी केल्यास व्याख्यानमाला आयोजनाचा उद्देश सफल होईल”.

परिषदेचा शुभारंभ भारतमाता पूजन आणि दीपप्रज्वलन करूनकरण्याथ आला. प्राचार्य रवींद्र वैद्य यांनी परिषद आयोजनाची भूमिका मांडली.
पाहुण्यांचा परिचय समीर कुलकर्णी यांनी करून दिला. पहिल्या सत्रात दिलीपजी क्षीरसागर यांचे बीजभाषण झाले. यात व्याख्यानमाला परंपरेचा आढावा घेऊन काळानुरूप व्याख्यान विषय निवडावेत असे सांगताना त्यांनी समाजाच्या प्रबोधनासाठी आधी “स्वबोधाची” गरज असल्याचे स्पष्ट केले. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वभोजन, स्वभ्रमण, स्वभजन या संकल्पनांचे सविस्तर विवेचन करून त्यांनी यावेळी संघशताब्दी
वर्षात ‘पंचसूत्री’ च्या आधारे जनजागृती सुरू असल्याची माहिती दिली. पर्यावरण, कुटूंब प्रबोधन, सामाजिक समरसता हे विषय प्राधान्याने घेऊन नागरी कर्तव्याची जाणीव जागी करण्यासाठी व्याख्यानमाला हे उत्तम माध्यम असल्याचे त्यांनी सूचित केले.

परिषदेच्या दुस-या सत्रात उपस्थित सदस्यांनी व्याख्यानमाला संयोजनात प्रामुख्याने वक्ते व विषयांची निवड, आर्थिक व व्यासपीठीय व्यवस्था, श्रोत्यांना आकृष्ट करण्यासाठी वातावरण निर्मिती, प्रसिध्दी व संपर्क या मुद्यांच्या आधारे समर्पक चर्चा केली. या सत्राची सूत्र रवींद्र शिंगणापूरकर यांनी सांभाळली. या चर्चेत राजेंद्र देशपांडे,पी.आर माडगुळकर, सुहास पोफळे, संजय गायकवाड,अजिंक्य साळुंके, किरण पाटोळे, अश्विनी कुलकर्णी, सचिन शिरोडे, मुकुंद पाटोळे, विवेक उमप, महेश मांडवकर, संभाजी कदम, हनुमंत गोपयाड ईत्यादी संयोजक सहभागी झाले.

कात्रज, लोणावळा, पिंपरी चिंचवड,येवलेवाडी, बाणेर पाषाण अशा शहर व परिसरातून तसेच आहिल्यानगर, बेलापूर ई. भागातून जवळ जवळ 75 व्याख्यानमाला संयोजक उपस्थित होते. समारोप करताना राजाभाऊ मुळे यांनी सद्य सामाजिक स्थितीवर भाष्य केले. चुकीच्या गोष्टीचे कथन करून समाजात वैचारिक संघर्ष पेटवणारे नॅरेटीव्ह पसरवण्याचे काम सध्या जगभर सुरू आहे, याकडे लक्ष वेधून त्यांनी समाजात दूही माजवणा-या प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी जगाचे कल्याण चिंतणारी आपली सामाजिक समरसतेची संस्कृती समर्थ आहे असे मत व्यक्त केले.

उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले. राघवेंद्र देशपांडे यांनी आभार मानले. स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आणि वैचारिक व्यासपीठ संपर्क आयाम तसेच विविध भागातील कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झाले होते.

4/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे