0
4
8
2
9
0
माझी पाककला
अंबाडीची भाकर
साहित्य: चार वाट्या ज्वारीचे पीठ, चार ते पाच हिरव्या मिरच्या, आठदहा लसूण पाकळ्या, एक चमचा धने जिरेपूड , मीठ,दोन वाट्या चिरलेली अंबाडीची भाजी,एक वाटी चिरलेली कोथिंबीर इत्यादी.
कृती:- अंबाडीची भाजी वाफवून घ्या.मिरची, लसूण, कोथिंबीर मिक्सरमध्ये फिरवून घ्या.हे सर्व जिन्नस ज्वारीच्या पीठात घालून चांगले मळा.गोळा तयार करून परातीत भाकरी थापा. चांगली खमंग भाजून हिरव्या मिरचीचा ठेचा व लोणच्यासोबत खायला द्या.
वाढप- ही रेसीपी दोन ते तीन जणांना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
0



