
0
4
8
2
9
0
शेती कवितेची
शेती कवितेची अवघड अति..
मेंदूतून खणून काढावी
लागते विचारांची माती..
एकाग्र मन ठेवल्या
शिवाय होत नाही नांगरणी..
विषयाचे योग्य बियाणे
असले की सुबक होते पेरणी..
अंकुरित झाले शब्द
मग वेगाने चालते लेखणी..
मधेच थोडीशी यमक,अलंकारांची
करावी लागते फवारणी..
स्वल्पविराम, उद्गार चिन्हे
प्रश्नचिन्हांची होते बांधणी..
कवितेची शेती करताना
मशागत करावी लागते कल्पनेची…
तेंव्हा कुठे बहरतात पिके काव्याची.
नुसते कोरडे लिखाण करून
होतं नाही बस…
त्यासाठी लागतो विचार आणि
बुद्धीचा कस..
कधी शब्द दुष्काळाचाही
करावा लागतो सामना..
इच्छाशक्ती असेल तर
ग्रीष्मात ही बहरतो
काव्य गुलमोहर देखणा..
मृदुला कांबळे
गोरेगांव -रायगड
======
0
4
8
2
9
0



