0
4
8
2
9
0
माझे गांव
माझे गाव चोहीबाजुनी
निसर्ग सौंदर्याने नटलेले
विस्तीर्ण अशा जंगलात
डोंगर कुशीत बसलेले. ॥१ ॥
प्रसिद्ध आठवडी बाजारात
भाजीपाला मिळे स्वस्त फार
ताजे रसरसीत फळे रसाळ
मिळे उसाचा रस थंडगार. ॥२ ॥
गावाजवळून वाहत राही
पूर्णामाय सदासर्वकाळ
छोटेमोठे पोहत असतात
सकाळ संध्याकाळ. ॥३ ॥
असे स्वच्छ अन् सुंदर
सदोदीत माझे गाव
स्वच्छता पुरस्कार यादीत
आमच्या गावाचे नांव. ॥४ ॥
जागृत देवीचा पुरातन ठेवा
माझ्या गावाचे वैभव भारी
सफल मनोकामना पूर्ण होई
प्राचीन मंदिराची किमया सारी ।५
दीपककुमार सरदार
ता. लोणार, जि.बुलढाणा
0
4
8
2
9
0



